Avoid these makeup mistakes
मेकअपच्या 'या' चुकांमुळे तुम्ही दिसू शकता वृद्ध! By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 04:45 PM2018-12-15T16:45:10+5:302018-12-15T16:54:38+5:30Join usJoin usNext अनेक महिलांना मेकअपच्या स्टेपची काही गरज नसते. पण असा विचार करणे खरंतर चुकीचं आहे. फाऊंडेशन मेकअपमध्ये एक परफेक्ट बेस काम करत असतं. याने तुमच्या चेहऱ्याला क्लीन आणि क्लिअर लूक मिळतो. याने तुमच्या चेहऱ्यावरील ड्राय पॅच आणि ऑयली भाग कव्हर केले जातात. त्यामुळे नेहमी त्वचेच्या प्रकारानुसार फाऊंडेशनचा वापर करा आणि मेकअपची सुरुवातही यानेच करा. (Image Credit : wwd.com) स्कीन टोन एक न करणं - अनेक महिला या फाऊंडेशन आणि कंसीलर केवळ चेहऱ्यावर लावतात. त्यांना मानेवर हे लावणे गरजेचे वाटत नाही. पण यामुळे होतं काय की, चेहऱ्याचा आणि मानेचा रंग वेगवेगळा दिसतो. जे दिसायला फारच विचित्र आणि वेगळं दिसतं. त्यामुळे तुम्हाला चमकदार आणि तजेलदार ग्लो हवा असेल तर याची काळजी घ्या की, स्कीनचा टोन एकसारखा राहील. (Image credit : www.kristenjacobs.com) जास्त शिमर लावणे - नेहमीच शिमरी किंवा इतरही चमकदार गोष्टी तुम्हाला सुंदर बनवत नसतात. सर्वांनाच फ्रेश लूक आवडतो. त्यामुळे नेहमीच चमकदार किंवा पटकन दिसणाऱ्या गोष्टी लावू नका. ब्लशचा चुकीचा वापर - ब्लश जर योग्यप्रकारे लावला गेला नाही तर गाल आता गेल्यासारखे दिसू लागतात. गुलाबी कलरच्या ब्लशच्या चुकीच्या वापराने तुम्ही वृद्ध दिसू शकता. त्यामुळे ब्लश नेहमी चांगल्या प्रकारे ब्लेंड करा, ज्याने तुम्हाला नॅच्युरल लूक मिळेल. (Image Credit : www.proprofs.com) डार्क लिप लायनर - जास्तीत जास्त मेकअफ आर्टिस्टचं हे मत असतं की, लिप लायनरमुळे तुमच्या ओठांना रुंदी आणि फुगलेला लूक मिळतो. पण याचा चुकीचा वापर केला गेला तर तुमचा सगळा लूक बदलू शकतो. कधीही लिप लायनर्सला ओठांना रिशेप करण्यासाठी वापरु नका. नेहमी नॅच्युरल लूक ठेवा आणि लिप लायनरचा कलर लिपस्टिकच्या कलरसोबत मॅच करायला हवा. (Image Credit : www.adorebeauty.com.au) पावडरने फिनिशिंग - अनेक महिला या मेकअप झाल्यावर वरुन पावडर लावतात. त्यांना असं वाटतं की, असे केल्याने मेकअप सेट होतो. पण पावडरमुळे तुमची त्वचा डल दिसू लागते. याने चेहऱ्याच्या फाइन लाइन्स वाढतात. अशात पावडरचा कमीत कमी वापर करा. (Image Credit : blog.contentbeautywellbeing.com)टॅग्स :ब्यूटी टिप्सBeauty Tips