टाचांना भेगा पडल्याने आहात हैराण? जाणून घ्या कारण तेव्हाच कराल योग्य उपाय! By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 12:06 PM 2024-11-30T12:06:38+5:30 2024-11-30T12:21:57+5:30
Cracked Heels: अनेकदा ही समस्या त्वचेत ओलावा असल्याने होते. पण याची आणखीही काही कारणे आहेत. जर तुम्ही टाचांना भेगा पडण्याची योग्य कारणे जाणून घेतली तरच योग्य उपचार करू शकाल. Cracked Heels: हिवाळा बऱ्याच लोकांना आवडतो. मात्र, हिवाळा आपल्यासोबत काही समस्याही घेऊन येतो. या दिवसांमध्ये त्वचेसंबंधी अनेक समस्या होतात. यातील एक कॉमन समस्या म्हणजे टाचांना भेगा पडणे. अनेकदा ही समस्या त्वचेत ओलावा असल्याने होते. पण याची आणखीही काही कारणे आहेत. जर तुम्ही टाचांना भेगा पडण्याची योग्य कारणे जाणून घेतली तरच योग्य उपचार करू शकाल.
१) जास्त वेळ उभे राहणे जास्त वेळ उभे राहिल्याने ही समस्या होते. एकाच जागेवर जास्त वेळ उभे राहिल्याने टाचांवर प्रेशर पडतं. ज्यामुळे त्याना भेगा पडतात. अशात टाचांमध्ये वेदना आणि रक्त येण्याचा धोका अधिक वाढतो.
२) चप्पल न घालता चालणे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल तर गवतावर उघड्या पायाने चालणे चांगलं असतं. मात्र, उघड्या पायाने चालल्याने पायांवर धूळ-माती लागू शकते, ज्यामुळे टाचांवर भेगाही पडू शकतात.
३) लठ्ठपणा वजन जास्त वाढल्याने टाचांना भेगा पडण्याचा धोका अधिक वाढतो. पायांव उभे राहिल्याने टाचांच्या खालील चरबीच्या पॅडवर दबाव वाढू शकतो. त्याशिवाय जर त्वचा मुलायम नसेल आणि त्यात लवचिकपणा नसेल तर टाचांवर दबाव पडू भेगा पडू शकतात.
४) एजिंग जसजसं तुमचं वय वाढतं, तसतशी त्वचा कमजोर होऊ लागते. वृद्ध लोकांची त्वचा जाड आणि ड्राय असते. वयानुसार त्वचेचा लवचिकपणा कमी होतो. त्वचेतून ऑइलची निर्मितीही कमी होते, ज्यामुळे टाचांवर भेगा पडतात.
५) स्वच्छता न करणे आपल्या चेहऱ्याप्रमाणेच पायही धूळ, माती आणि प्रदूषणाच्या संपर्कात येतात. त्यामुळे बाहेरून घरात जाण्यापूर्वी पाय चांगले धुवावे. जेणेकरून त्यांवरील धूळ निघून जाईल. तसेच पाय घासून धुवावे जेणेकरून डेड स्कीन निघून जाईल. हिवाळ्यात पायांवर मॉइश्चरायजर लावावे.
६) जास्त वेळ पाण्यात राहणे जर आपण हिवाळ्यात पुन्हा पुन्हा पाय पाण्यात भिजवले तर याने टाचांवर भेगा अधिक वाढू शकतात. त्यामुळे पाय गरज असेल तरच धुवा. विनाकारण पाय पाण्यात भिजवणं चांगलं नाही.