diet tips healthy food to get rid of dark circles naturally
डार्क सर्कलपासून मुक्तता हवीय, मग डाएटमध्ये करा हे बदल By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 03:04 PM2018-05-23T15:04:39+5:302018-05-23T15:04:39+5:30Join usJoin usNext डार्क सर्कल कमी करण्यासाठी अनेक उपाय करुन थकले आहात, तर मग आता केवळ स्वतःचं डाएट बदलून पाहा. केवळ डार्क सर्कलच नाही तर डाएट फॉलो केल्यानं चेहऱ्यावर नैसर्गिक चमकदेखील येते. पाण्याचे अधिक सेवन करावे - त्वचेला नैसर्गिकरित्या ग्लो मिळावा, यासाठी पाण्याचे अधिकाअधिक सेवन करावे. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्यास त्वचा रुक्ष होते आणि डार्क सर्कलची समस्या निर्माण होते. जेवढे तुम्ही पाण्याचे सेवन कराल तेवढी तुमची त्वचा अधिक उजळण्यास मदत होते. चहा-कॉपी पिणं टाळा - चहा, कॉफी, ब्लॅक-टी यामध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते. कॅफिनचं सेवन अधिक केल्यानं त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. डार्क सर्कलच्या समस्येपासून मुक्तता हवी असल्यास कॅफिनचं सेवन पूर्णतः बंद करावे. चहा-कॉफी पूर्णतः बंद करणं शक्य नसल्यास निदान त्याचे सेवन कमी करावे. मिठाचेही सेवन कमी करावे-मिठामुळे शरीर डी-हायड्रेट होते. मिठाच्या सेवनामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते. यामुळे त्वचा पिवळी आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळंदेखील तयार होतात. आहारात प्रोटीन्सचे प्रमाण वाढवा - डार्क सर्कलपासून मुक्तता मिळवण्यासाठी आहारात प्रोटीन्स, मिनरल्सचे प्रमाण वाढवावे. हिरव्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करावा. पाणी व ज्युसचे सेवन अधिक करावे. मात्र सिगारेट आणि मद्यसेवनापासून दूर राहावे. टॅग्स :ब्यूटी टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सBeauty TipsHealthHealth Tips