शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आय मेकअप करताय? मग आयलायनर लावण्याच्या 'या' पद्धती नक्की वापरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 4:00 PM

1 / 6
डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी काजळ, आय लायनर, आय शॅडो, मस्कारा अशा अनेक गोष्टींचा वापर केला जातो. यामुळे डोळे अधिकच आकर्षक होतात. आय मेकअप करताना आय लायनरला विशेष महत्त्व असते. आय लायनर लावण्याच्या विविध पद्धती जाणून घेऊया...
2 / 6
विग आयलायनर या लूकमध्ये सर्वप्रथम बेसिक आयलायनर लावावे. त्यानंतर एक स्ट्रोक डोळ्याबाहेर काढला जातो. चेहऱ्याला सूट होईल अशा स्वरुपाचा जास्त मोठा किंवा लहान स्ट्रोक काढला की चेहरा अधिक सुंदर दिसतो.
3 / 6
कॅट आय लायनर या लूकमध्ये लायनर लावताना पाकळीच्या आकाराप्रमाणे आयलायनर लावावे. मात्र शेवटी जाड लाइन काढून विंग बाहेर काढावा. हा विंग आयलायनरपेक्षा थोडा जाड असावा. पार्टीसाठी जाताना हा लूक अधिक चांगला दिसतो.
4 / 6
डबल विंग आयलायनरमध्ये डोळ्यांना दोनदा वर आणि खाली विंगच्या आकारात लायनर लावावे. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांसाठी अशा पद्धतीचे आयलायनर खूपच छान दिसते.
5 / 6
ग्लिटर आयलायनरची सध्या तरुणींमध्ये क्रेझ आहे. एखाद्या खास पार्टीला जायचे असल्यास ग्लिटर आयलायनर हा परफेक्ट ऑप्शन आहे. गोल्डन आणि सिल्वर रंगाचे ग्लिटर लायनर हे प्रामुख्याने वापरले जाते.
6 / 6
स्मोकी आयलायनरने चेहऱ्याला स्टायलिश लूक मिळतो. या पद्धतीने लायनर लावणे ही अत्यंत सोपे असते. यामध्ये डोळ्यांना आधी बेसिक लायनर लावावे. त्यानंतर थोडंसं आयलायनर डोळ्यांवर स्मज करावं. हायलाइट करण्यासाठी डोळ्यांवर आयशॅडोने हायलाइट करता येते.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स