eye makeup tips for those girls who wear lens
लेन्सचा वापर करता?; मग मेकअप करताना घ्या ही काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 2:40 PM1 / 81. हात स्वच्छ करुन घ्या : मेकअप करण्यापूर्वी आपले दोन्ही हात योग्य पद्धतीनं स्वच्छ करुन घ्यावेत आणि नंतर सुकवावेत. यामुळे मेकअप करताना लेन्सवर डाग पडणार नाहीत आणि डोळ्यांना संसर्गाचा धोका होणार नाही. 2 / 82. डोळ्यांच्या आत मेकअप करु नये : काही मुलींना डोळ्यांच्या आतमध्ये काजळ लावण्याची सवय असते. मात्र जर तुम्ही लेन्स वापरत असाल तर डोळ्यांच्या आतमध्ये काजळ लावू नका. यामुळे डोळ्यांची जळजळ होण्याची शक्यता असते.3 / 83. ऑईल फ्री-प्रोडक्ट वापरा : लेन्ससोबत मेकअप करायचा असल्यास ऑईल फ्री-प्रोडक्टचाच वापर करावा. ऑईली प्रोडक्ट्सपासून निघणारे तेलयुक्त पदार्थ लेन्स शोषून घेते. यामुळे धुरकट दिसू लागते.4 / 84. फायबरयुक्त मस्कारा : डोळ्यांचा मेकअप करताना फायबर युक्त मस्काराचा वापर टाळावा. यामुळे डोळ्यांमध्ये इन्फेक्शन, जळजळ आणि खाज असा त्रास होऊ शकतो. यामुळे मस्काराचा वापर फार काळजीपूर्वक करावा. 5 / 85. खोट्या पापण्या : पापण्यांचे केस घनदाट दिसवाते, यासाठी सध्या महिला वर्गात खोट्या पापण्या लावण्याची फॅशन क्रेझ आहे. पण लेन्स लावलेल्या असल्यास याचा वापर करणं डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक ठरू शकते. त्याऐवजी याचा वापर करूच नये. 6 / 86. मेक-अपनंतर लेन्सचा वापर टाळा : बहुतांश मुली मेकअप केल्यानंतर लेन्सचा वापर करतात. पण ही पद्धत चुकीची आहे. मेक अप करण्यापूर्वी लेन्स लावाव्यात. यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ आणि खाज येण्याची समस्या निर्माण होत नाही. 7 / 87. आयशॅडो जर तुम्ही कॉस्मेटिक लेन्स वापरत असाल तर पावडरऐवजी क्रीम आयशॅडोचा वापर करावा. हे बराच वेळ डोळ्यांमध्ये टिकून राहत आणि कोणताही त्रास होत नाही. 8 / 8या गोष्टीही ठेवा लक्षात : 8. हलक्या हातांनी मेकअप करावा, जेणेकरुन डोळ्यांतून लेन्स बाहेर येणार नाहीत. कोणत्याही प्रोडक्टमुळे जळजळ होत असल्यास लगेचच डोळे थंड पाण्यानं धुवून घ्या. आणखी वाचा Subscribe to Notifications