home remedies for immaculate and glowing skin
स्वस्तात हवीय सौंदर्याची हमी; किचनमधले 'हे' पदार्थ येतील कामी! By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 7:41 PM1 / 11सुंदर दिसणयाची प्रत्येक मुलीची इच्छा असते. त्यासाठी अनेकदा महागतल्या महाग ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करण्यात येतो. पण बाजारातील उत्पादनांमध्ये अनेक केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करण्यात येतो. जी शरीरासोबतच त्वचेसाठीही घातक ठरतात. पम तुम्हाला माहीत आहे का? बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांपेक्षा घरगुती उपाय त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुमच्या त्वचेवरील डाग दूर होण्यासोबतच ती उजळण्यासह मदत होते. 2 / 11टॉमेटो कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए आणि लायकोपिन यांसारखी तत्व असतात. यामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असल्यामुळे तुम्ही टॉमेटोचा वापर एखाद्या ब्लीच क्रिमप्रमाणेही करू शकता. टॉमेटोची पेस्ट 15 मिनिटं चेहऱ्यावर लावून 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका. दररोज असं केल्यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होईल. 3 / 11मलई आणि हळद एकत्र करून 5 ते 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. त्यानंतर पाण्याने धुवून टाका. यामुळे त्वचेचा रंग उजळ्यासोबतच त्वचेवरील डाग दूर होण्यासही मदत होईल. 4 / 11गाजर किसून पाण्यामध्ये टाकून उकळवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने त्याची बारिक पेस्ट तयार करा. ही पेस्ट 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून पाण्याने धुवून टाका. दररोज असं केल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग यांसारख्या समस्या दूर होतील. 5 / 11संत्र्याची साल सुकवून मिकस्रमध्ये वाटून घ्या. त्यानंतर त्यामध्ये ग्लिसरीन मिक्स करून मसाज करा. 10 मिनिटं तसचं ठेवून पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होईल. 6 / 11डार्क सर्कल्स किंवा ब्राउन स्पॉट्सपासून सुटका करण्यासाठी बटाट्याची सालीच्या मदतीने चेहऱ्यावर मसाज करा. बटाट्यामध्ये नॅचरल ब्लीचिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे स्किन प्रॉब्लेम्स दूर होण्यासोबत चेहरा उजळण्यासही मदत होईल. 7 / 11बेसन, हळद आणि दही मिक्स करून मानेवर आणि शरीरावर मसाज करा. सुकल्यानंतर 14 ते 20 मिनिटांनंतर आंघोळ करा. दररोज असं केल्याने मानेवरील काळेपणा दूर होण्यासाठी मदत होईल. 8 / 11एका टीस्पून मधामध्ये लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्यावर मालिश करा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. दररोज असं केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होईल.9 / 11त्वचा निरोगी आणि तजेलदार करण्यासाठी लिंबाचा रसामध्ये दूध आणि दही मिक्स करा आणि दररोज चेहऱ्यावर लावा. 10 / 11पपईची साल काढून तिचा गर काढून चेहऱ्यावर लावा. त्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होईल. 11 / 11साखर घेऊन त्यामध्ये थोडं ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. या मिश्रणाने हातांना स्क्रब करा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications