Winter Hair Care : 5 winter hair care tips for hair problems
Winter Hair Care : चमकदार केस हवे आहेत?, वाचा या टीप्स By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 3:02 PM1 / 5सौंदर्य केवळ चेहऱ्यावरुन नाहीच तर मजबूत आणि घनदाट केसांवरही अवलंबून असतं. मुलींचे लांबसडक आणि चमकदार केस त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अधिक भर घालतात. पण हल्ली प्रदूषण, पोषक तत्त्वांचा अभाव, कोंडा इत्यादी कारणांमुळे केसगळती, कोरडेपणा यांसारख्या समस्या उद्भवतात. पण योग्य प्रकारे केसांची देखभाल केल्यास या समस्या नक्कीच कमी होतील. 1. तेल मसाज : हिवाळ्यात आठवड्यातून एकदा नारळ तेल किंवा बदामाच्या तेलानं हलक्या हातानं मसाज करावा. स्कॅल्पला मसाज केल्यानं रक्ताभिसरण योग्यरितनं होते आणि केसांचा कोरडेपणा कमी होतो. 2 / 52. केसांना स्कार्फ बांधा : प्रदूषण आणि थंड हवेपासून केसांचा बचाव करण्यासाठी त्यांना स्कार्फ बांधा. प्रवासादरम्यान स्कार्फचा वापर कटाक्षानं करावा. 3 / 53. ट्रिमिंग : फाटे फुटलेल्या केसांच्या समस्येमुळे बहुतांश महिला हैराण असतात. ही समस्या दूर करण्यासाठी वेळच्या वेळी केस ट्रिम करत राहा.4 / 54. कंडिशनर वापरा : शॅम्पूनं धुतल्यानंतर केसांना न विसरता कंडिशर लावा. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो. शिवाय, केस चमकदारही होतील.5 / 55. योग्य देखभाल घ्यावी : नियमित केस धुतल्यामुळे केसांमधील ओलावा संपुष्टात येतो. स्कॅल्पवरील नैसर्गिक स्वरुपात असलेल्या तैल ग्रंथी सुकू लागतात. यामुळे केस निर्जिव दिसतात. यामुळे आठवड्यातून किमान दोनदा केस धुवावेत. आणखी वाचा Subscribe to Notifications