शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

४ दिवस ४ ग्रहांचे गोचर: ‘या’ ९ राशींना सुख-समृद्धी, धनवृद्धीचे योग; पद-पैसा वृद्धिंगत होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 11:12 AM

1 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च महिना विशेष ठरणारा आहे. या आगामी काळात नवग्रहांचा सेनापती मंगळ या आठवड्यात वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. तसेच शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. नवग्रहांचा राजा रवि म्हणजेच सूर्य कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. तर, नवग्रहांचा राजकुमार बुध मीन राशीत प्रवेश करेल.
2 / 15
आगामी काळ ग्रह-नक्षत्रांच्या दृष्टिने अतिशय शुभ मानला जातो. मीन राशीतील बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग जुळून येत आहे. तसेच शुक्राच्या मेष राशीतील प्रवेशाने राहु आणि शुक्राचा युती योग जुळून येत आहे. ग्रहांच्या या गोचराने अनेक राशीच्या लोकांची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकेल. कुटुंबात आनंद राहू शकेल.
3 / 15
तर काही राशींना कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. या आगामी काळातील ग्रह गोचराचा तुमच्या राशीवर कसा परिणाम होऊ शकेल. करिअर, नोकरीच्या दृष्टिने तुम्हाला काय लाभ मिळू शकतील, ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. प्रवासाच्या माध्यमातून शुभ संयोग घडेल. प्रवास यशस्वी होईल. आनंद, शांतता मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात. खर्च होऊ शकतात. धनहानी होण्याची शक्यता वाढू शकते. सुख-समृद्धीसाठी प्रयत्न करावे लागतील. अपेक्षेपेक्षा कमी परिणाम मिळू शकतील.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. नवीन प्रकल्प शुभ परिणाम देईल. सर्जनशील कार्यातूनही सकारात्मक परिणाम प्राप्त मिळू शकतील. प्रवासातून यश प्राप्त होऊ शकेल. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीबाबतीत निराशा होऊ शकेल.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना आगामी काळ आर्थिक बाबींसाठी शुभ राहील.धनाच्या आगमनाचे शुभ संयोग घडतील. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडतील. प्रवासातून यश प्राप्त होईल आणि. कामाच्या ठिकाणी दिलेली आश्वासने पूर्ण होतील. प्रकल्प बॅकअप प्लॅनसह हाताळू शकाल.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना आगामी काळ आनंददायी जाऊ शकेल. आर्थिक बाबींमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमात बदल दिसून येतील. हळूहळू पैसे मिळण्याचे योग तयार होतील. सुख-समृद्धी येण्यासाठी प्रयत्न करत राहावे. कामाच्या ठिकाणी कोणताही विचार न करता बोलणे समोरच्या व्यक्तीचे मन दुखवू शकते. भविष्याभिमुख राहिल्यास बरे होईल.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना आगामी काळ यशकारक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. यशाच्या मार्गावर पुढे जाऊ शकाल. यश मिळूनही मन एखाद्या गोष्टीबद्दल उदास राहील. आर्थिक बाबींमध्ये अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. प्रवासात शुभ योगायोग तयार होतील. यश मिळू शकेल. समजूतदारपणाने घेतलेले निर्णय शुभ परिणाम देतील.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी खुलेपणाने आपले मत व्यक्त करावे. स्वतःचे निर्णय घेतले तर चांगले होईल. सुख-समृद्धीचा योग येईल. आर्थिक दृष्टिकोनातून विचार केल्यास खर्च जास्त होऊ शकेल. विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला शुभ परिणाम देऊ शकतील.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल. संयमाने आणि विचारपूर्वक निर्णय घेणे हिताचे ठरू शकेल. सुख-समृद्धी अपेक्षेपेक्षा कमी असेल. प्रोजेक्ट आणि आर्थिक आघाडीबाबत काही तणाव जाणवू शकेल. कालांतराने गोष्टी चांगल्या होतील. यश प्राप्त होऊ शकेल.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आगामी काळ आर्थिक बाबतीत काळ अनुकूल राहील. धनलाभाचे शुभ योग जुळून येऊ शकतात. प्रवास शुभ परिणाम देईल. आनंद आणि सौहार्द राहील. कामाच्या ठिकाणी आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करून वाटचाल करावी. यश, प्रगतीची संधी मिळू शकेल.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल राहू शकेल. धनप्राप्तीचे योग जुळून येऊ शकतात. प्रवासामुळे शुभ संयोग निर्माण होतील. जीवनात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी बंधने येतील. इतर लोक तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. हवे तसे बदल होण्यास वेळ लागेल.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना आगामी काळ शुभ राहू शकेल. आनंद आणि सामंजस्य असेल. कार्यक्षेत्रातील कोणत्याही नवीन प्रोजेक्टबाबत चिंतित होऊ शकता. आर्थिक बाबतीत, अनावश्यक खर्च जास्त होऊ शकतो. काही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. संयमाने कोणताही निर्णय घ्यावा. सुख-समृद्धीचे योग जुळून येऊ शकतील. कामाच्या ठिकाणी अचानक प्रतिकूल बातम्या मिळू शकतात. सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे यश, प्रगती साध्य करू शकाल. आर्थिक बाबतीत समतोल साधून पुढे गेल्यास बरे होईल. एखादी गोष्ट चर्चेने सोडवली तर बरे होईल.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. करिअरमध्ये प्रगतीसाठी अनेक संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्ही जितके विचारपूर्वक निर्णय घ्याल, तितके फायदे तुम्हाला मिळतील. खर्चात वाढ होऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य