५ ग्रहांचे गोचर: ३१ दिवस ‘या’ ५ राशींना प्रचंड लाभ, अपार पैसा; तुमची रास कोणती? पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 01:50 PM2023-03-02T13:50:34+5:302023-03-02T14:04:15+5:30

मार्च महिन्यातील एकूण ग्रहस्थितीचा तुमच्यावर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च महिन्याच्या सुरुवातीला अस्तंगत असलेल्या शनीचा उदय होईल. याशिवाय बुध, मंगळ, सूर्य आणि शुक्र हे चार महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. मार्च महिना ग्रहांच्या गोचराच्या बाबतीत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

मार्च महिन्यात होळी, गुढीपाडवा, श्रीराम नवमी, चैत्र नवरात्र यांसारखे सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. १२ मार्च रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर यानंतर मंगळ ग्रह मिथुन राशीत विराजमान होत आहे. यासह सूर्य आणि बुध ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करतील.

विशेष म्हणजे मार्च महिन्याच्या अखेरीस गुरु ग्रह अस्तंगत होईल. या सर्व ग्रहांच्या गोचराचा सर्व राशींवर प्रभाव दिसून येईल. मात्र, मेष, वृषभ यांसह ५ राशीच्या व्यक्तींना मार्च महिना खूप फायदेशीर ठरू शकेल. तुमच्यावर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना सकारात्मक ठरू शकेल. या महिन्यात कठोर परिश्रम करावे लागतील. एखाद्याचा सल्ला खूप फायदेशीर ठरु शकेल. आर्थिक आघाडीसाठी हा काळ चांगले ठरू शकेल. पैशांची आवक वाढू शकेल. व्यापार आणि व्यवसायाच्या बाबतीत अनुकूल ठरू शकेल. प्रगती होईल. दिलासा मिळू शकेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना अनुकूल ठरू शकेल. लव लाईफ चांगली असू शकेल. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. कामगिरी कौतुकास्पद होऊ शकते. आणखी चांगले करण्यास आपण प्रवृत्त होऊ शकाल. मात्र, घाईने केलेल्या कामात फायदा होईलच असे नाही. संयमाने कृती करणे हिताचे ठरू शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना काहीसा संमिश्र ठरू शकेल. दाम्पत्य जीवनात काही चढ-उतारांचा, समस्यांचा सामना करावा लागू शकेल. जोडीदारासोबतचे संबंध खास असतीलच असे नाही. एखाद्या गोष्टीवरून वाद निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला असल्याचे सिद्ध होईल. मनाप्रमाणे गोष्टी घडण्याची शक्यता आहे.

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना अनुकूल ठरू शकेल. अध्यात्मिक गोष्टींमध्ये जास्त रस घ्याल. जोडीदारासोबतचे नातेसंबंध मजबूत होऊ शकतील. विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले काम पूर्ण करण्यावर भर द्यायला हवा. फायदा होऊ शकेल. नशिबाची साथ लाभेल. उत्पन्न वाढवेल. नोकरीमध्ये पदोन्नतीची अपेक्षा असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकेल किंवा पगारात वाढ होऊ शकते. नोकरीत अधिक जबाबदारी येऊ शकते. कारकीर्दीच्या हा काळ भाग्योदयाचा ठरू शकतो.

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना काहीसा संमिश्र ठरू शकेल. लव लाईफमध्ये काही गैरसमज होऊ शकतात. कालांतराने गैरसमज दूर होऊ शकती. विवाहेच्छुकांसाठी नवीन स्थळे येऊ शकतात. एखाद्या चांगल्या व्यक्तीची भेट होऊ शकते. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना चांगला ठरू शकतो. या महिन्याची सुरुवात खूप चांगली होऊ शकेल. स्वत:ला विकसित करण्यासाठी काही चांगल्या संधींची प्रतीक्षा करू शकता. या महिन्याच्या दुसर्‍या भागात, व्यवसाय वर्गातील लोकांना बराच फायदा मिळू शकतो. तसेच, आपले प्रेम जीवन देखील जोरदार नेत्रदीपक असेल. आपण एखाद्यावर खूप प्रेम करू शकता. याक्षणी, आपल्याला आपले मन शांत आणि एकटे ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल.

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना संमिश्र ठरू शकेल. या महिन्यात आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. कोणतेही दुखणे अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल. कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त ताण न घेणे हिताचे ठरू शकेल. संयमाने केलेली सर्व कामे यशकारक ठरू शकतील. सकारात्मक विचारांचा चांगला उपयोग होऊ शकेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना अनुकूल ठरू शकेल. लव लाईफच्या बाबतीत आगामी काळ शानदार असू शकेल. आपल्या भावना आपण योग्य पद्धतीने व्यक्त करू शकाल. या महिन्यात आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक असणे आवश्यक आहे. अधिक कठोर परिश्रमांची आवश्यकता आहे. योगासने आणि ध्यानधारणा करणे हिताचे ठरू शकेल.

धनु राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना चांगला ठरू शकेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येऊ शकेल. या महिन्यात कार्यक्षेत्रात नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. मात्र, यश आणि प्रगती साध्य करण्यासाठी काहीसा विलंब होऊ शकतो. पूर्ण क्षमतेने काम केल्यास मनाजोगे परिणाम प्राप्त होऊ शकतात. तुमच्या यशाने गुरुवर्ग, वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न असू शकतील.

मकर राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना अनुकूल ठरू शकतो. या महिन्यात जवळच्या व्यक्तीकडून किंवा जुन्या मित्राकडून चांगले प्रस्ताव मिळू शकतात. नाते खूप घट्ट होईल. कोणताही निर्णय घ्याल, तो अत्यंत काळजीपूर्वक घ्या. कोणाशी व्यर्थ वाद घालू नका. मानसिक तणाव येऊ शकतो. मनोकामना पूर्ण होऊ शकतील.

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना फायदेशीर ठरू शकेल. आगामी काळ चांगला ठरू शकेल. नियमित तपासणी करून घेणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी काम खूप चांगले होईल. भरपूर नफा मिळू शकतो. सहकारी आणि बॉस यांच्याशी तुमचे संबंध सुधारू शकतात.

मीन राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना संमिश्र ठरू शकेल. आत्मपरीक्षण करावे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू शकतो. वरिष्ठांशी सल्लामसलत करण्याचा सल्ला दिला जातो. ध्येय साध्य करायचे असेल तर धीर धरा. करिअरसाठी विशेष फलदायी ठरू शकतो. कलागुणांना वाव मिळू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.