शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Home Vastu Tips : घरात या ठिकाणी लावा तुळस; होईल धनवर्षाव, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 7:44 PM

1 / 9
तुळस ही भगवान विष्णूंना सर्वात प्रिय आहे. ती देवी लक्ष्मीचे रूप मानली जाते. असे मानले जाते की ज्या घरामध्ये तुळशीचे रोप हिरवे सतत हिरवे राहते त्या घरातील लोक नेहमी प्रसन्न राहतात आणि अशा घरांमध्ये देवी लक्ष्मीचाही वास असतो.
2 / 9
देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरी राहावा यासाठी तुळस योग्य दिशेने असणे आवश्यक आहे. वास्तूमध्येही तुळशीच्या दिशेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. तुळशीचे रोप योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी ठेवल्यास तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि आर्थिक स्थिती मजबूत होते.
3 / 9
यामुळेच तुळशीला प्रत्येक घराच्या अंगणाचे सौंदर्य मानले जाते. तुळशीचे रोप लावताना कोणत्या गोष्टींची सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे आणि ती कोणत्या दिशेला ठेवावी हे आपण पाहू.
4 / 9
जुन्या काळी घराच्या अंगणाच्या मध्यभागी तुळशीचे रोप लावण्याची परंपरा होती, जेणेकरून त्या रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी मिळेल. पण आता घरांचा आकार पूर्वीपेक्षा खूपच लहान झाला असल्याने आणि मोठ्या शहरांमध्ये फ्लॅट संस्कृती वाढल्यामुळे तुळशीचे रोप लावायचे कुठे हा मोठा प्रश्न आहे.
5 / 9
तुम्हाला हवे असल्यास मुख्य दारावर तुळशीचे रोपही लावू शकता. पण जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यात हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश येत नसेल तर तुळशीचे रोप देखील सुकू शकते. त्यामुळे अशा घरांच्या बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप लावता येते.
6 / 9
पण लक्षात ठेवा की बाल्कनी उत्तरेकडे किंवा पूर्वेला असावी. मान्यतांनुसार या दोन्ही दिशांना देवतांचा वास असल्याचे मानले जाते. उत्तर दिशेला धनाची देवता कुबेराचे स्थान मानले जाते. त्यामुळे या दिशेला तुळस लावल्याने तुमच्या घरात धनाचा प्रवाह वाढतो.
7 / 9
वास्तूच्या नियमानुसार चुकूनही तुळशीचे रोप दक्षिण दिशेला लावू नका. ही दिशा पितरांचे स्थान मानली जाते आणि या दिशेला तुळशीचे रोप लावल्यास सुकते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरावर नाराज होते असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येते. पितरांच्या पूजेसाठी या दिशेचा वापर केला जातो, त्यामुळे इथे चुकूनही तुळशीचे रोप लावू नये.
8 / 9
जर तुमच्या घरात पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असतील तर स्वयंपाकघराबाहेर तुळशीचे रोप ठेवा. असे केल्याने तुमच्या नात्यामध्ये सुधारणा होईल आणि प्रेम वाढू लागते असेही म्हटले जाते.
9 / 9
जर तुमच्या घरात पैसा वाचवता येत नसेल तर तुळशीचा हा उपाय करा. घराच्या ईशान्य कोपर्‍यात तुळशीचे रोप ठेवा. असे केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सुख समृद्धी मिळू शकते, असे म्हटले जाते. (सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.)
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रMONEYपैसा