शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Astro Tips: पूजाविधीशी संबंधित 'या' गोष्टी चुकूनही खाली पडू देऊ नका; होईल मनःस्ताप!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 4:55 PM

1 / 6
एखादी गोष्ट हातातून निसटून जमिनीवर पडली की नुकसान तर होतेच वरून घरच्यांची बोलणी ऐकावी लागतात ती वेगळी! मात्र काही गोष्टींचे नुकसान भरून निघणे कठीण असते. शिवाय त्या पडल्याची, फुटल्याची, तुटल्याची चुटपुट मनाला जास्त त्रास देते. कारण काही गोष्टी आपण पूज्य, पवित्र मानतो. त्यांचा संदर्भ देवधर्माशी असतो. त्यामुळे अकारण मनात पाप लागेल ही भीती त्रास देते. यासाठी पुढील बाबींचा खुलासा करून घेऊ.
2 / 6
दिव्याशी खेळ करू नये. आजच्या झगमगाटीच्या दुनियेत तुळशीपाशी लावलेला दिवा किंवा देवघरात लावलेला दिवा आश्वासक वाटतो. सकारात्मक ऊर्जा देतो. शिवाय दिव्याची ज्योत हे अग्नीचे सूक्ष्म रूप, परंतु ती जरा कापड, कागद किंवा अन्य ज्वलनशील घटकांच्या संर्पकात आली तर हाहाक्कार माजवू शकते. म्हणून पूजेच्या दिव्याला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. पूजा करताना दिवा मालवला तर पुन्हा प्रज्वलित करावा आणि देवाची क्षमा मागून पूजा पूर्ण करावी!
3 / 6
पाण्याने भरलेला कलश, हंडा, कळशी हे सुबत्तेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. जल है तो जीवन है असे आपण म्हणतो. बाहेरगावी पाणी विकत घ्यावे लागते किंवा पाणीकपात झाल्यावर नळावरून पाणी भरावे लागते, तसेच गावाकडे विहिरीवरून पाणी भरून आणावे लागते, तेव्हा पाण्याची किंमत कळते. असे बहुमूल्य पाणी वाया जाणे हे सर्वाथाने अशुभच आहे. पाण्याचा वापर सुयोग्य पद्धतीने केला पाहिजे. बचत केली पाहिजे. गळके नळ दुरुस्त केले पाहिजेत व पाणी सांगणार नाही, वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे! म्हणून गृह प्रवेशाच्या वेळी सुजाण मुलीच्या हाती पाण्याचा कलश देतात, जेणेकरून ते पाणी सांडू नये.
4 / 6
कुंकू हे आपण सौभाग्याचे प्रतीक मानतो. तसेच ते देवीला वाहतो आणि तिच्याकडे सौभाग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धी मागतो. त्यामुळे कुंकवाचा करंडा जमिनीवर सांडणे हे अशुभ मानले जाते. म्हणून तो हाताळताना काळजी घ्यावी. लहान मुलांचा वावर असलेल्या ठिकाणी कुंकू ठेवू नये. जमिनीवर सांडलेले कुंकू केरसुणीने भरू नये. कापडाने ते भरून घेत एखाद्या आडवळणाच्या झाडाशी टाकून यावे. सांडलेल्या कुंकवाचा पुनर्वापर करू नये. किंवा रांगोळी रंग म्हणून त्याचा वापर करावा.
5 / 6
हा अत्यंत नाजूकपणे आणि सावधपणे हाताळण्याचा प्रकार असतो. कारण देवाची मूर्ती दगडाची, काचेची, मातीची किंवा अन्य कसलीही असली तरी आपण त्यात देवत्त्व पाहतो. तिची पूजा करतो. त्यामुळे ती मूर्ती सावधपणेच हाताळायला हवी. अनावधानाने मूर्ती हातातून पडली आणि दुभंगली तर पुन्हा भग्न मूर्ती घरात ठेवावी की नाही इथून प्रश्न उभे राहतात. भग्न मूर्ती डोळ्यांना खटकते. वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याशिवाय तिला पर्याय नसतो. म्हणून लहान मुलांच्या हाती अशी मूर्ती देऊ नये आणि मोठ्यांनीही देवमूर्ती सांभाळून हाताळावी!
6 / 6
तीर्थ असो वा प्रसाद तो न सांडता पटकन तोंडी लावावा अशी बालपणापासून आपल्याला शिकवण मिळालेली असते. तरी अंगात असलेला धसमुसळेपणा आपल्याला स्वस्थ बसू देत नाही आणि प्रसादाचे कण किंवा कधी कधी प्रसादाचा द्रोण, साखरदाणे जमिनीवर सांडतात. अशा वेळी वरवरचा प्रसाद काढून घ्यावा आणि माती लागलेला प्रसाद केरसुणीने न भरता कापडाने भरून चिमण्या कावळ्यांना टाकावा पण केराच्या टोपलीत फेकू नये.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र