बुधाचा शनीच्या राशीत प्रवेश: ‘या’ ७ राशींना शुभ फलदायी, अडकलेला पैसा मिळेल; पगारवाढीचे योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 01:54 PM2023-02-28T13:54:19+5:302023-02-28T13:59:56+5:30

बुध व शनी हे मित्र ग्रह मानले गेले असून, आगामी काळात काही राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

मार्च महिन्याला सुरुवात होत आहे. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह मार्च महिन्यात दोनदा राशीपरिवर्तन करणार आहे. मात्र, तत्पूर्वी २७ फेब्रुवारी रोजी बुधने शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश केला आहे. याच राशीत बुध अस्तंगत होणार आहे. (budh gochar in kumbh rashi 2023)

बुध आणि शनी मित्र ग्रह मानले गेले आहे. बुधाचा शनीच्या कुंभ राशीत होत असलेला प्रवेश आणि याच राशीत अस्तंगत होणे अनेक राशींसाठी लाभदायक मानले जात आहे. या राशींना बुधाचे गोचर शुभ फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घेऊया... (mercury transit in aquarius 2023)

वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर जीवनात नवी पहाट घेऊन येणारे ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. बॉस आणि वरिष्ठ अधिकारी कौतुक करतील. काम पाहून इतर संस्थेकडून फोन येऊ शकतो. काही कामात व्यत्यय येऊ शकतो. प्रयत्नांनी सर्व कामे सोपी होतील. व्यावसायिकांसाठी हा काळ थोडा कठीण असू शकतो. कोणताही महत्त्वाचा निर्णय खूप विचार करून घ्या.

मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर विशेष लाभदायक ठरू शकेल. विदेशाशी संबंधित व्यापार करणाऱ्यांना ही ग्रहस्थिती उत्तम मानली जाते. चांगला नफा कमावण्याची संधी मिळू शकते. काम जलदगतीने होऊ शकेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असेल, त्यांना यश मिळेल. नोकरदारांना यश येईल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर शुभ प्रभावाचे ठरू शकेल. ज्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहात, त्यात गती मिळेल. फायदा होईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक मानला जातो. कुटुंबात तुमचे काही गैरसमज वाढू शकतात. बुध आणि शनीच्या संयोगाने संकटे दूर होऊ शकतील.

कन्या राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर यशकारक ठरू शकेल. समस्या कमी होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी काही अडचणी आल्या तरी लवकर त्यातून बाहेर पडू शकाल. आर्थिक आघाडीत सुधारणा दिसून येऊ शकेल. अडकलेला पैसा परत मिळू शकेल. कार्यालयात कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा. वकिली क्षेत्रात असणाऱ्यांना यशाचा काळ आहे. एकापाठोपाठ एक चांगल्या केसेस मिळण्याची शक्यता आहे.

तूळ राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर जीवनातील समस्या कमी होण्याची शक्यता आहे. हा काळ यशकारक ठरू शकेल. कुठेतरी अडकलेले पैसे मिळू शकतात. करिअरच्या काही चांगल्या संधी मिळू शकतात. चांगल्या पगारवाढीसह उच्च पद मिळवू शकता. सरकारी नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता आहे.

मकर राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर शुभ ठरू शकेल. पैशाचा ओघ वाढू शकेल. शांतता प्रस्थापित होईल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. मित्रांच्या मदतीने तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतात. कुटुंबासोबत सहलीला जाण्याची योजना बनू शकते. आनंद द्विगुणित होऊ शकेल. सासरच्यांशी तुमचे संबंध सुधारतील. आर्थिक स्थिती सुधारेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर नवीन आणि शुभ संधींचे ठरू शकेल. अधिकार्‍यांचा आशीर्वाद मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. नुकतीच नोकरी बदललेल्यांना नवीन ठिकाणी क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक बाबतीत तुम्हाला काही चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.