शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gudi Padwa 2023: चैत्री नवरात्राचा शुभ काळ! ‘या’ ९ राशींना दुर्गा देवीच्या कृपेने धनलाभ; अपार यश, भाग्य योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 7:07 AM

1 / 15
मराठी नववर्षाला सुरुवात होत आहे. मराठी नववर्षातील पहिले नवरात्र म्हणजेच चैत्री नवरात्र साजरे केले जाणार आहे. १९४५ शालिवाहन शक सुरू होत असून, यंदाचे शोभन नामक संवत्सर सुरु होत आहे. श्रीराम नवमीला चैत्री नवरात्राची सांगता होईल. घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे उत्साहात स्वागत केले जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार, गुढी पाडव्याला अतिशय शुभ फलदायी योग जुळून येत आहेत.
2 / 15
नवीन संवत्सर सुरू होत असून, यात सर्व ग्रहांचे राजे, मंत्री, सेनापती यांची स्थिती बदलत आहे. यासोबतच ५ ग्रहांचा शुभ संयोग तयार होत आहे. नवीन वर्षाची सुरुवात होताना मीन राशीत गुरु, सूर्य आणि बुध ग्रह विराजमान असतील. मेष राशीत शुक्र आणि राहु विराजमान असतील. मिथुन राशीत मंगळ, तूळ राशीत केतु आणि मकर राशीत शनी विराजमान असेल. गुढी पाडव्याला चंद्र मीन राशीत असेल.
3 / 15
एकूणच ग्रह स्थितीचा तुमच्या करिअर, आर्थिक आघाडी, शिक्षण, व्यवसाय, नोकरी यांवर कसा प्रभाव असेल. गुढी पाडवा आणि चैत्र नवरात्रीचा काळ तुमच्यासाठी कसा असू शकेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, यश-प्रगती साध्य करण्याच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील? ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळू शकेल. काही चांगली बातमी मिळेल. आनंददायी घटना घडू शकतील. एक सुखद योगायोग जुळून येऊ शकेल. आर्थिक बाबींमध्ये खर्च जास्त होऊ शकतो. सुख-समृद्धीचे योग येऊ शकतील. जीवनात अनुकूलता येऊ शकेल.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल ठरू शकेल. आर्थिक बाबतीत अनुकूलता येऊ शकेल. आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती असेल. संपत्ती वाढण्याचे शुभ संयोग घडतील. प्रवास यशस्वी होईल. जीवनात आनंदी व्हाल. कामाच्या ठिकाणी ताण येऊ शकतो. कौटुंबिक बाबी सर्वसमावेशक दृष्टीकोनातून हाताळल्यास आनंद होईल. एकाग्रतेने केलेले काम तुम्हाला शुभ फळ देईल.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना हा काळ सकारात्मक ठरू शकेल. आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होत आहे. कोणतीही नवीन गुंतवणूक चांगले परिणाम देऊ शकेल. मन प्रसन्न राहील. कुटुंबात आपले मत खुलेपणाने ठेवून कोणतेही गैरसमज दूर केले जाऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अनावश्यक भांडणे टाळली तर बरे होईल. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वेळ अचानक अनुकूल होईल आणि मन प्रफुल्लित राहू शकेल.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल असू शकेल. कौटुंबिक सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत तुमची मेहनत भविष्यात सुंदर परिणाम देऊ शकेल. व्यवसायात अनेक आश्वासने दिली जातील, परंतु ती किती पूर्ण होतात हे येणारा काळच सांगेल. प्रवासात बॅक अप प्लान ठेवल्यास तो यशस्वी होऊ शकेल. चांगली बातमी मिळेल.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना हा काळ चांगला ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि मान-सन्मान वाढेल. तुमची मते विरोधकांनाही पटू शकतील. कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी हा शुभ काळ आहे. अनेक कामे एकत्र पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा दिसून येईल. कुटुंबात आनंद आणि सौहार्द राहील. सुख-समृद्धीचे योगायोग जुळून येतील. प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ घालवाल. मन प्रसन्न राहील.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना हा काळ अनुकूल ठरू शकेल. कार्यक्षेत्रात शुभ परिणाम दिसून येऊ शकतील. प्रोजेक्ट्स वेळेवर पूर्ण होऊ शकतील. चांगली बातमी मिळू शकेल. आर्थिक बाबींसाठी हा काळ शुभ राहू शकेल. धनाच्या आगमनाचे शुभ संयोग घडतील. एखाद्या व्यक्तीची मदत अत्यंत मोलाची ठरू शकेल. मुलांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. कल्याण होऊ शकेल. आनंददायी घटना घडू शकतील.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना हा काळ सकारात्मक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात यश मिळविण्याच्या अनेक संधी मिळतील. प्रोजेक्ट्स वेळेवर पूर्ण होऊ शकतील. रचनात्मक कार्यातून शुभ परिणाम मिळू शकेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकेल. जोखीम पत्करून केलेल्या कामात यश प्राप्ती होऊ शकेल. प्रवासात एखाद्या व्यक्तीची मदत अत्यंत मोलाची ठरू शकेल.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. कार्यक्षेत्रात यश मिळू शकेल. आर्थिक बाबींमध्ये काही समस्या, अडथळे वाटू शकतात. मन अस्वस्थ राहू शकेल. चिंता आणि तणाव राहू शकेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. कालांतराने शुभ योगायोग घडतील. अनुकूलता येऊ शकेल. अनेकविध संधी मिळू शकतील.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. कुटुंबात समतोल निर्माण करून पुढे गेलात तर चांगले परिणाम दिसून येऊ शकतील. व्यवसायिकांना प्रवासातून शुभ योगायोग तयार होऊ शकतील. यशही प्राप्त होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी आंबट-गोड अनुभव येतील. काही कामांमुळे तणाव वाढेल. प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी मदतीची आवश्यकता भासू शकेल. जीवनात आनंददायी घटना घडू शकतील.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना हा काळ अनुकूल ठरू शकेल. आर्थिक लाभाची मजबूत परिस्थिती निर्माण होईल. गुंतवणुकीबाबत खूप जागरूक असायला हवे. खूप व्यस्त राहू शकाल. कामाच्या ठिकाणी वाटाघाटी करून मुद्दे सोडवले तर बरे होईल. कुटुंबातील एखाद्या गोष्टीबद्दल मन दु:खी होऊ शकते. एक नवीन सुरुवात जीवनात सुखद अनुभव घेऊन येऊ शकेल.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. कुटुंबाच्या सहवासात आनंदी असाल. सुंदर भविष्यासाठी काही ठोस निर्णयही घेऊ शकता. व्यवसायिकांना प्रवासात शुभ परिणाम दिसून येऊ शकतील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी आंबट-गोड अनुभव येतील. आश्वासने पूर्ण होतील असे नाही. दुसरीकडे कोणीतरी पुढे होऊन मदत करू शकेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतल्यास लाभ होईल. मन प्रफुल्लित राहील.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना हा काळ अनुकूल ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकेल. प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊ शकतील. चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक बाबींमध्ये मन चिंतित होऊ शकते. हवा तसा आनंद मिळण्यासाठी जास्त वेळ लागू शकेल. सुख-समृद्धीचे शुभ संयोग जुळून येऊ शकतील. मन प्रसन्न राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यgudhi padwaगुढीपाडवाMONEYपैसा