बेटी? ही तर धनाची पेटी! विशेषतः 'या' राशीच्या मुलींमुळे उजळते वडिलांचे भाग्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 08:19 AM2022-04-23T08:19:49+5:302022-04-23T08:27:14+5:30

मुली या वडिलांच्या लाड्क्या असतात. 'पापा कि परी' असेही त्यांना म्हटले जाते. प्रत्येक वडिलांसाठी आपली मुलगी खासच असते. कारण ती वडिलांना फार जीव लावते, जपते, काळजी घेते. असे असले तरी ज्योतिष शास्त्रानुसार ठराविक राशीच्या मुलींचे आपल्या वडिलांशी जास्त सख्य असते असे म्हटले आहे.

या मुलींमुळे वडिलांचा भाग्योदय होतो आणि केवळ वडिलांची ओळख मुलीला नाही तर मुलीची ओळख वडिलांना मिळावी एवढी कीर्ती त्या संपादन करतात, असा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास आहे. तर अशा कोणत्या पाच राशींबद्दल हे भाकीत वर्तवले आहे ते जाणून घेऊ.

ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या मुली बुद्धिमान, मेहनती आणि प्रामाणिक असतात. ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करण्याचा त्यांचा नेहमीच ध्यास असतो. त्यामुळे त्यांची प्रगती झपाट्याने होते. त्या आपल्या वडिलांचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल करतात. त्यांच्या नशिबामुळे त्यांच्या वडिलांनाही त्यांच्या कामात भरपूर यश मिळते. या मुलींचा तर वडिलांनंतर नवराही खूप भाग्यवान ठरतो.

कर्क राशीच्या मुली त्यांच्या वडिलांसाठी आणि कुटुंबासाठी खूप भाग्यवान ठरतात. त्यांच्या जन्मापासून कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत बदल दिसू लागतात. वडिलांचे उत्पन्न वाढू लागते. याशिवाय या मुली खूप हुशार आहेत आणि कमी वयातच खूप यश मिळवतात.

तूळ राशीच्या मुली अतिशय हुशार आणि संतुलित स्वभावाच्या असतात. त्या प्रतिभावान आणि ध्येयांप्रति समर्पित असतात. त्या जे काही ठरवायचे ते करूनच थांबतात. त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व लोकांना त्यांच्याकडे सहज आकर्षित करते. त्या वडिलांचा आणि कुटुंबाचा सन्मान करतात.

कन्या राशीच्या मुली खूप सर्जनशील असतात. लहानपणापासूनच आपल्या कलागुणांनी त्या नाव कमवू लागतात. त्या वडिलांसाठी खूप भाग्यवान ठरतात. त्यांचा हातभार लागल्याने वडिलांच्या कामात फायदा होतो, उत्पन्न आणि प्रतिष्ठा वाढते.

शनीच्या प्रभावामुळे मकर राशीच्या मुली मेहनती, प्रामाणिक आणि खूप दयाळू असतात. त्या केवळ त्यांच्या कुटुंबाचीच नव्हे तर इतरांचीही काळजी घेतात. त्यांच्या स्वभावामुळे त्या सर्वांना आवडतात. त्याचबरोबर करिअरमध्येही खूप नाव कमावतात. ध्येयाप्रती सजग असतात आणि ध्येयप्राप्ती करून त्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करतात.