शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Festival Vibes 2023: नवरात्रीपासून आता सणांची रेलचेल सुरू राहणार ती थेट त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत; सविस्तर वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 4:43 PM

1 / 9
या मनमोहक वातावरणाबरोबर येणार आहेत आपल्या सगळ्यांचे आवडते सण! नवरात्रापासून त्याची सुरुवात होत त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतचा भरगच्च उत्सव कसा आणि कधी असेल ते जाणून घेऊया.
2 / 9
यंदा अधिक श्रावण मास आल्यामुळे पुढचे सगळे सण थोडे थोडे पुढे सरकले. त्यामुळे यंदा घटस्थापना अर्थात नवरात्रीचा पहिला दिवस रविवारी १५ ऑक्टोबर रोजी असणार आहे.
3 / 9
शनिवारी २१ ऑक्टोबर रोज महाअष्टमी आहे. अनेक ठिकाणी या दिवशी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. मुखवट्याच्या महालक्ष्मीची पूजा केली जाते. तर दुर्गानवमीचा उपास २३ ऑक्टोबर रोजी केला जाईल.
4 / 9
नवरात्रोत्सवाची सांगता २४ ऑक्टोबर रोजी दसरा या सणाने होणार आहे. हा उत्सव आपट्याची पाने ज्यांना आपण सोने म्हणतो, ते देऊन तसेच सरस्वतीची पूजा करून साजरा करायचा आहे.
5 / 9
२८ ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमा आहे, त्यालाच आपण `कोजागिरी पौर्णिमा' असेही म्हणतो. देवी लक्ष्मी या दिवशी `कोऽऽजागरति' असे विचारत, देह, बुद्धी, मन आणि जबाबदारीने जागृत असणाऱ्या भक्तांना आशीर्वाद देते.
6 / 9
९ नोव्हेंबर पासून दिवाळीची सुरुवात वसुबारसने होईल. १० नोव्हेंबरला धनत्रयोदशी असणार आहे. १२ तारखेला, दीपावलीचे अभ्यंग स्नान अर्थात नरक चतुर्दशी असणार आहे. त्याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील आहे, तर १४ तारखेला बलिप्रतिपदा आणि १५ तारखेला भाऊबीज आहे.
7 / 9
दीपावलीच्या अवघ्या दहा दिवसांवर कार्तिकी एकादशीचा सोहळा असणार आहे. २३ नोव्हेम्बर रोजी प्रबोधिनी एकादशी आहे. त्याबरोबर चातुर्मास समाप्ती होईल आणि तुलसी विवाहास प्रारंभ होऊन लग्न समारंभालाही सुरुवात होईल.
8 / 9
२६ नोव्हेम्बर रोजी त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव असून त्या दिवशी पुनश्च दिव्यांची आरास करून आसमंत उजळेल अशी रोषणाई केली जाईल आणि या सर्व उत्सवाची सांगता २७ नोव्हेम्बर रोजी तुलसी विवाह समाप्तीने होईल.
9 / 9
इथून पुढे सण संपले तरी चातुर्मासात खोळंबलेले समारंभ सुरू होतील. पुढे मार्गशीर्ष मासात २५ डिसेम्बर रोजी दत्तजयंती असेल आणि त्यानंतर वेध लागतील नववर्षाचे, अर्थात २०२४ च्या आगमनाचे!
टॅग्स :Navratriनवरात्रीDiwaliदिवाळी 2022