तुमचा जोडीदार 'या' राशीचा असेल तर डोळे मिटून त्याच्यावर विश्वास टाका; तुमचे भलेच होईल! By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 12:33 PM 2022-04-06T12:33:18+5:30 2022-04-06T12:37:02+5:30
इतर नात्यांच्या तुलनेत जोडीदाराशी नाते जास्त जवळचे असते. या नात्यात आपुलकी, जवळीक, प्रेम आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे विश्वास असेल तर उपयोग. तो असेल तर नाते परिपूर्ण होते. टिकते आणि मुरते. अर्थात लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. त्यानुसार तुम्हाला तुमचा जोडीदार मिळेलच. मात्र तो जर पुढीलपैकी एका राशीचा निघाला तर तुम्ही भाग्यवान ठरू शकता. कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवणे म्हणजे सर्वकाही त्याच्या हाती सोपवण्यासारखे आहे. विश्वासू मित्र, जोडीदार आणि सहकारी शोधणे खूप कठीण आहे. मात्र ज्योतिषशास्त्रात अशा काही राशींचा उल्लेख केला आहे, ज्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया त्या राशींबद्दल.
मेष : ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीचे लोक खूप प्रामाणिक, दयाळू आणि नेहमी सत्याचे समर्थन करणारे असतात. या राशीच्या लोकांना अघळ पघळ बोलणे आवडत नाही. ते थेट मुद्द्याचे बोलतात आणि जे ऐकतात ते गोपनीय ठेवतात. या राशीच्या लोकांजवळ तुम्ही मन मोकळे करू शकता. ते विश्वासाला तडा जाऊ देत नाहीत.
कर्क : कर्क राशीचे लोक विश्वासार्ह असतात. यासोबतच ते खूप भावूकही मानले जातात. मित्र किंवा जीवनसाथी म्हणून या राशीचे लोक खूप चांगले असतात. जोडीदाराच्या रूपात या राशीच्या व्यक्तीला मिळणारी साथ ही एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नसते. कर्क राशीचे लोक विश्वासार्ह असतात तसेच सुख-दु:खात साथ देतात.
सिंह : सिंह राशीचे लोक प्रामाणिक तसेच विश्वासार्ह असतात. ते कोणाचाही विश्वास तोडत नाहीत आणि अडचणीच्या वेळी एकटेही सोडत नाहीत. साधारणपणे या राशीच्या लोकांना खोटे बोलणाऱ्या लोकांबद्दल तीव्र तिरस्कार असतो.
मकर : मकर राशीच्या लोकांमध्ये प्रामाणिकपणा असतो. या राशीच्या लोकांवर सहज विश्वास ठेवता येतो. तेही दुसऱ्यांवर सहज विश्वास ठेवतात. तसेच या राशीचे लोक स्वभावाने शांत आणि गंभीर असतात. तुम्ही तुमचे मन त्यांच्याकडे मन मोकळे करू शकतात.
कुंभ : कुंभ राशीचे लोक बुद्धिमान मानले जातात. त्याबरोबरीने ते विश्वासूही असतात. या राशीच्या लोकांच्या प्रामाणिकपणावर शंका घेण्याची गरजच पडणार नाही. या राशीच्या लोकांवर विश्वास ठेवता येईल. तुमच्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे गोपनीय राहतील.