know about these 4 zodiac signs persons with different mindset than generation
‘या’ ४ राशीच्या लोकांना असते ‘हटके’ विचार करण्याची सवय! तुमची रास कोणती? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 10:30 AM1 / 7ज्योतिषशास्त्रात नवग्रह आणि १२ राशीच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबाबत अंदाज व्यक्त केले जातात. एखाद्या व्यक्तीची जन्मकुंडली, त्यातील ग्रहांची आणि राशींची स्थिती तसेच स्थान यांवरून काही तर्क लावले जातात.2 / 7एखाद्या व्यक्तीचे आयुष्य, जोडीदार, आर्थिक स्थिती यांचा एक अंदाज बांधला जाऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, काही व्यक्ती अशा असतात, ज्यांना एकांत आवडत असतो. समाजापासून या व्यक्ती दूर राहू इच्छितात. त्या व्यक्ती काय करतात किंवा त्या कशा वागतात, याचा संबंध नसतो, असे म्हटले जाते. 3 / 7काही व्यक्ती अशा असतात ज्यांचे विचार समाजापेक्षा वेगळे असतात. परंपरागत जीवन जगणे, त्यांना फारसे पसंत नसते. इतरांपेक्षा वेगळे विचार असल्यामुळे यांकडे अन्य मंडळींचा बघण्याचा दृष्टिकोन काहीसा वेगळा असतो, असे सांगितले जाते. चला तर मग जाणून घेऊया...4 / 7ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या व्यक्ती सुखवस्तू असल्याचे मानले जाते. साधारणपणे सामान्य व्यक्तींना काहीशा स्वस्तातील आणि सांभाळण्यास सोप्या असतील. मात्र, वृषभ राशीच्या व्यक्तींना उंची आणि महागड्या वस्तू खरेदी करणे, त्याचा उपभोग घेणे जास्त पसंत असते. उच्च जीवनशैली जगणे यांना अधिक आवडते, असे सांगितले जाते. 5 / 7ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या व्यक्ती आरामात जीवन जगणे पसंत करतात. काहीवेळा या व्यक्ती निष्काळजीपणाने बोलतात, वागतात, असे म्हटले जाते. मात्र, या व्यक्तींची एक गोष्ट घेण्यासारखी असते, ती म्हणजे केलेल्या शेड्युलप्रमाणेच त्या काम करतात. शेड्युलप्रमाणे कामे पूर्ण करणे त्यांना आवडते. तसेच अन्य व्यक्तींना सांगितलेली कामेही योग्य पद्धतीने, गुणवत्तापूर्वक पूर्ण व्हावीत, यावर त्यांचा भर असतो. यामुळे या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात, असे सांगितले जाते. 6 / 7ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या व्यक्तींना आठवणींमध्ये रमायला अधिक आवडते, असे सांगितले जाते. तसेच जुन्या, पुरातन वस्तू जपून ठेवणे साठवणूक करण्याचाही या व्यक्तींना छंद असतो. या व्यक्तींकडे अनेकविध बहुमूल्य, अमूल्य आणि हटके वस्तूंचा संग्रह सापडू शकतो. तसेच सहजरित्या न मिळणाऱ्या वस्तूही या राशीच्या व्यक्ती जमवतात, असे सांगितले जाते. 7 / 7ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या व्यक्ती बहुतांश वेळा आत्ममग्न असतात. आपल्याच दुनियेत गर्क असतात. लोक त्यांच्याविषयी काय बोलतात, काय विचार करतात, याकडे त्यांचे लक्ष नसते. तर सामाजिक परंपरा आणि धारणा यांचे पालन करणे आवडते. याशिवाय अन्य कुणाचे ऐकून करण्यापेक्षा या व्यक्ती आपले मार्ग ते स्वतःच निवडतात, असे म्हटले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications