शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वप्नात स्वतःचेच लग्न पाहिले? जाणून घ्या यामागील अर्थ आणि संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 6:54 PM

1 / 10
स्वप्न ही आशावादाचे एक प्रतीक मानले जातात. स्वप्न सकारात्मकता देतात. आयुष्यात पुढे जाण्याची उर्मी, ऊर्जा देतात, असे सांगितले जाते. जीवन जगण्याची नवी दिशा देतात. स्वप्न ही ऊर्जावान असतात.
2 / 10
मनी वसे, ते स्वप्नी दिसे, असे म्हटले जाते. रात्री झोपल्यावर कोणते स्वप्न पडेल, हे माणसाच्या हातात नसते. स्वप्नांवर कोणाचे नियंत्रण नसते असे म्हणतात. कधी, कसलं स्वप्न पडेल सांगता येत नाही. ज्योतिषशास्त्राची एक शाखा म्हणजे स्वप्नशास्त्र.
3 / 10
रात्री झोपल्यानंतर माणसाला पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ स्वप्नशास्त्राच्या माध्यमातून घेतला जातो. स्वप्नांचे विशिष्ट प्रकारचे संकेत असतात. स्वप्न भविष्यातील घटनांचा वेध घेतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. विवाहविषयी पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ, संकेत आणि काही मान्यतांविषयी जाणून घेऊया...
4 / 10
जर स्वप्नात आपले किंवा अन्य कोणाचे लग्न पाहिले तर याचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही अर्थ असतात, असे मानले जाते. स्वप्नात एखादी मुलगी आपल्या प्रियकराला कुणा अन्य मुलीशी लग्न करताना पाहत असेल तर तिचे लग्न लवकर होते. पण त्या मुलीचे लग्न तिच्याच प्रियकरासोबत होईल, असा त्याचा अर्थ होत नाही.
5 / 10
रात्री झोपल्यानंतर स्वप्नात एखादी मुलगी विवाहाच्या कपड्यांमध्ये दिसली तर हा शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ नजीकच्या काळात तुमची एखादी इच्छा पूर्ण होणार आहे. हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्णत्वास जाऊ शकते, असे मानले जाते.
6 / 10
रात्री झोपल्यानंतर स्वप्नात कुंकू, मंगळसूत्र किंवा अंगठी अशा लग्नासंबंधी गोष्टी दिसल्यास सावध व्हावे. कारण तुमच्याविरुद्ध कारस्थान रचले जात असून, हितशत्रू आणि विरोधकांचा त्रास आगामी काळात संभवतो, असा त्या स्वप्नामागे संकेत असल्याचे मानले जाते.
7 / 10
स्वप्नात नवरा आणि नवरी सात फेरे घेताना दिसले तर तो अशुभ संकेत मानला जातो. आगामी काळात आव्हाने, अडचणी, समस्यांचा सामना करावा लागू शकतो, असा संकेत यामागे असल्याचे मानले जाते.
8 / 10
एखादी व्यक्ती स्वप्नात नीलकंठ किंवा सारस पक्षी पाहतो, किंवा त्याला स्पर्श करतो आणि त्याच वेळी त्याला जाग येते, तेव्हा असा व्यक्तीला सुंदर, रुपवान पत्नी मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
9 / 10
स्वप्नात पत्नीसोबत एकरुप होताना पाहणे हा शुभ संकेत असल्याचे मानले जाते. अशा प्रकारचे स्वप्न पडल्यास तुमच्यासाठी आगामी काळ चांगला असून, मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात, असे मानले जाते.
10 / 10
स्वप्नात नवरीला रडताना किंवा तिची पाठवणी होत असताना पाहत असाल तर, आगामी काळात तुम्हाला नुकसान सोसावे लागू शकते. अशात तुमच्या उपजिवीकेशी संबंधित कामांबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष