know the rules where you can establish ganesh idol in home for remove vastu dosh
गणपती बाप्पाची स्थापना घरामध्ये नेमकी कुठे करावी? 'हे' नियम जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 4:48 PM1 / 8गणपती ही सर्वांना हवीहवीशी वाटणारी देवता आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते. बुद्धीदाता, गणांचा अधिपती, प्रथमेश यांसारख्या विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. माघ महिन्यात गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विघ्नहर्ता, सुखकर्ता अशी ओळख असणाऱ्या गणपतीची दररोज कोट्यवधी कुटुंबात पूजा केली जाते. 2 / 8अबालवृद्धांमध्ये जो भजला, पूजला, स्मरिला जातो, अशा या गणपतीची घरात स्थापना करताना काही नियम सांगितले जातात वा काही काळजी घ्यावी असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती किंवा तसबीर घरात नेमकी कुठे स्थापन करावी, याबाबत काही भाष्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. 3 / 8गणपतीविषयी अनेक शास्त्रात, पुराणात विविध प्रकारचे उल्लेख आढळतात. मात्र, महादेव आणि पार्वतीचा पुत्र म्हणून त्याची मुख्य ओळख सांगितली जाते. गणपती हा विघ्नहर्ता मानला जातो. घरामध्ये काही दोष असतील, तर गणपती कृपेने ते दूर होऊ शकतात. वास्तुशास्त्र यावर भाष्य करते आणि प्रकाशही टाकते.4 / 8ब्रह्मदेवाने वास्तुशास्त्र रचले आहे, अशी मान्यता आहे. वास्तुदोषामुळे घराची रचना बदलण्याचाही सल्ला दिला जातो. मात्र, काही वास्तुदोष केवळ गणपती पूजन, नामस्मरणाने दूर होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 5 / 8वास्तुशास्त्राप्रमाणे जीवनात सातत्याने समस्या, अडचणी येत असल्यास गणपतीची तसबीर घरात लावण्याचा सल्ला दिला जातो. गणेशाची तसबीर घरातील प्रवेशद्वाराबाहेर आणि आत अशा दोन्ही ठिकाणी समान जागी लावावी. घरातील दोष दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता असल्याचे वास्तुशास्त्र सांगते.6 / 8घरामध्ये विशिष्ट ठिकाणी असलेल्या वास्तुदोषासाठी वास्तुरचनेत बदल न करता त्या ठिकाणी तूपमिश्रित शेंदूराचे स्वस्तिक काढावे, असे सांगितले जाते. शेंदूर हा गणपतीचे प्रतीक मानले गेल्यामुळे बाप्पाचा आशिर्वाद कायम सोबत राहतो, अशी मान्यता आहे.7 / 8वास्तुशास्त्राप्रमाणे घर किंवा कार्यालयातील वास्तुदोष दूर करण्यासाठी दक्षिण व नैऋत्य दिशेच्या कोनामध्ये वक्रतुंड रुपातील गणपतीची प्रतिमा लावावी, असे सांगितले जाते. मात्र, या प्रतिमेतील वक्रतुंड गणपतीचे मुख दक्षिण दिशेला किंवा नैऋत्य कोनाकडे अजिबात असता कामा नये, अशी मान्यता आहे.8 / 8गणपती ही शांत देवता असली, तरी तिचा प्रकोप विध्वंसक मानला जातो. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी बसलेल्या गणपतीची तसबीर लावावी. तर कार्यालयातील वास्तुदोष दूर करण्यासाठी उभ्या असलेल्या गणपतीची तसबीर लावावी. मात्र, यामध्ये गणपतीचे दोन्ही पाय जमिनीला लागलेल्या स्थितीत असावेत, असे सांगितले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications