मंगळ-गुरु कुंभेत युती: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना चांगले दिवस; नोकरी, करिअरमध्ये उत्तम लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 03:41 PM2022-04-12T15:41:36+5:302022-04-12T15:48:41+5:30

शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत मंगळ आणि गुरुची युती नेमक्या कोणत्या राशींना अच्छे दिन असणारी ठरू शकेल? जाणून घ्या...

धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनासह ज्योतिषीय दृष्टिनेही एप्रिल महिना अतिशय अद्भूत मानला गेला आहे. कारण, या एकाच महिन्यात सर्व नवग्रह आपापले स्थानपरिवर्तन करणार आहे. (mars and jupiter conjunction aquarius 2022)

नवग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला असून, नवग्रहांचा गुरु बृहस्पतीदेखील कुंभ राशीतच विराजमान आहे. मंगळ हा आक्रमक, क्रूर, उग्र मानला जातो. तर गुरु नोकरी, करिअर यांचा कारक मानला जातो. (mangal guru yuti in kumbha rashi 2022)

या दोन्ही परस्परविरोधी गुणधर्म असलेल्या ग्रहांची युती कुंभ राशीत झालेली आहे. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. त्यामुळेही या युतीला वेगळे महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. या युतीचा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल, ते जाणून घेऊया...

गुरु-मंगळ युती मेष राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल. तसेच मोठ्या संधी प्राप्त होऊ शकतील. धनलाभाचे योग असून, मिळकत वाढू शकेल. नोकरदारवर्गाला पदोन्नती मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल.

गुरु-मंगळ युती वृषभ राशीच्या व्यक्तींना उत्तम ठरू शकेल. नोकरीत चांगले सहकार्य लाभू शकेल. करिअरमध्ये यश, प्रगतीचे मार्ग साध्य करू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम असू शकेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. प्रवास करावे लागू शकतील. कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागू शकेल.

गुरु-मंगळ युती मिथुन राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. मिळकतीचे नवे स्रोत सापडू शकतील. कमाई वाढू शकेल. नोकरदार आणि व्यापारी वर्गाला सदर काळ अतिशय चांगला जाऊ शकेल. मालमत्ता, जमिनीतील गुंतवणूक भविष्यात लाभदायक ठरू शकेल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. हाती घेतलेल्या कामांत यश मिळू शकेल.

गुरु-मंगळ युती कर्क राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम देणारी ठरू शकेल. व्यापारी वर्गाला आर्थिक लाभ होऊ शकतील. नोकरीत प्रमोशन आणि बदलीचे संकेत आहेत. पैशांची समस्या दूर होऊ शकेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. कार्यालयातील सहकाऱ्यांची वाद होऊ शकतात.

गुरु-मंगळ युती सिंह राशीच्या व्यक्तींना संमिश्र स्वरुपाची ठरू शकेल. दाम्पत्य जीवनात वाद होऊ शकतात. कौटुंबिक वादाचे प्रसंग उद्भवू शकतील. कालांतराने समस्यांचे निराकरण होऊ शकेल. आनंददायी घटना घडू शकतील. नोकरदार आणि व्यापारी वर्गाला कार्यक्षेत्रात काही लाभ मिळू शकतील.

गुरु-मंगळ युती कन्या राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल. मान, सन्मान वृद्धिंगत होऊ शकतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. हितशत्रूंवर विजय मिळवू शकाल. नोकरदारांना चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतील.

गुरु-मंगळ युती तूळ राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. करिअरमध्ये काही चढ-उतार पाहायला मिळू शकतील. कामे करताना सतर्कता बाळगावी. प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

गुरु-मंगळ युती वृश्चिक राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. तणावाचे प्रसंग उद्भवू शकतात. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आक्रमकता वाढू शकेल. कुटुंब, मित्रपरिवाराशी असलेले संबंध बिघडू शकतात.

गुरु-मंगळ युती धनु राशीच्या व्यक्तींना भाग्यकारक ठरू शकेल. भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात प्रगती करू शकाल. नोकरीत हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकेल. आगामी कालावधीत चांगला जाऊ शकेल.

गुरु-मंगळ युतीचा काळ मकर राशीच्या व्यक्तींना चांगला ठरू शकेल. सुख, समृद्धी वृद्धिंगत होऊ शकेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.

गुरु-मंगळ युती कुंभ राशीच्या शुभ परिणामकारक ठरू शकेल. निर्णय क्षमता वाढू शकेल. करिअर, नोकरीत शुभवार्ता मिळू शकतील. प्रलंबित, अडकलेली कामे मार्गी लागू शकतील. काही कारणास्तव चिडचिड होऊ शकते. व्यापारी वर्गाने नवीन कार्ये घेण्यापूर्वी हातात असलेली कामे पूर्ण करणे उपयुक्त ठरू शकेल.

गुरु-मंगळ युती मीन राशीच्या व्यक्तींना समस्याकारक ठरू शकेल. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. खर्चात अचानक वाढ होऊ शकेल. कुटुंबातील वातावरण बिघडू शकेल. नोकरदारांनी सतर्क राहून कामे करावीत. जोखीम पत्करू नये, असे सांगितले जात आहे.