शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mars Transit Scorpio 2021: मंगळाचा वृश्चिकेत प्रवेश: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना मंगलमय काळ; मिळेल भरघोस लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 10:55 PM

1 / 14
ज्योतिषशास्त्रात काही कालावधीनंतर प्रत्येक ग्रह राशीबदल करत असतात. नवग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ग्रह आपलेच स्वामित्व असणाऱ्या वृश्चिक राशीत ०५ डिसेंबर रोजी प्रवेश केला आहे. वृश्चिक राशीत मंगळ ०४ जानेवारी २०२२ पर्यंत विराजमान असेल. (Mars Transit Scorpio 2021)
2 / 14
मंगळ ग्रहाला अग्नि तत्त्वाचा आणि उग्र ग्रह मानले जाते. कुंडलीत मंगळ ग्रह मजबूत आणि बलस्थानी असेल, तर व्यक्तीचा आत्मविश्वास, पराक्रम वाढीस लागतो. सर्जनशीलता वाढते. मंगळ ग्रह सन २०२१ वर्ष सरताना कोणत्या राशीच्या व्यक्तींना भरघोस लाभ देईल, ते जाणून घेऊया... (mangal gochar in vrischika rashi 2021)
3 / 14
मंगळ ग्रहाचा वृश्चिक राशीतील प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरेल. मात्र, आपल्या योजना कोणासमोर प्रकट करू नका, असा सल्ला दिला जातो. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहावे. हितशत्रू मित्र बनून फसवणूक करू शकतात. गुंतवणुकीकडे विशेष लक्ष द्यावे. कौटुंबिक वादातून मार्ग काढावा. आरोग्याची काळजी घ्यावी.
4 / 14
मंगळ ग्रहाचा वृश्चिक राशीतील प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र ठरू शकतो. भागीदारीतील व्यवहार कामे करताना सावधगिरी बाळगावी. कार्यक्षेत्रात आणखी मेहनत घ्यावी लागेल. अडचणीतून मार्ग काढण्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी उत्तम आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी चांगली संधी प्राप्त होऊ शकते.
5 / 14
मंगळ ग्रहाचा वृश्चिक राशीतील प्रवेश मिथुन राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. भविष्यातील योजनांवर काम करण्यास सुरुवात करणे अनुकूल ठरेल. अनेक उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. मात्र, प्रतिस्पर्धकांकडे बारीक लक्ष ठेवावे. गुंतवणूक करताना तज्ज्ञांना सल्ला घेणे आवश्यक ठरू शकेल. हितशत्रूंपासून सावध राहावे.
6 / 14
मंगळ ग्रहाचा वृश्चिक राशीतील प्रवेश कर्क राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. नोकरदार वर्गाला काही अडचणी येऊ शकतात. बदली होऊ शकते. मानसिक चिंता वाढू शकते. कार्यक्षेत्रात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चर्चेतून मार्ग निघू शकतील. भ्रमात राहू नये, असे सांगितले जात आहे.
7 / 14
मंगळ ग्रहाचा वृश्चिक राशीतील प्रवेश सिंह राशीच्या व्यक्तींसाठी परिवर्तनमय ठरू शकेल. कुटुंबात मंगल कार्य घडू शकेल. आपल्याकडील ऊर्जा योग्य कामासाठी वापरावी. विद्यार्थी वर्गाला आणखी मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी, असे म्हटले जात आहे.
8 / 14
मंगळ ग्रहाचा वृश्चिक राशीतील प्रवेश कन्या राशीच्या व्यक्तींना उत्तम ठरू शकेल. आर्थिक आघाडीवर सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील. प्रयत्न यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त करू शकतील. नोकरदार वर्गाला प्रमोशनच्या संधी मिळू शकतील. वेतनवृद्धीचा योग जुळून येऊ शकतो. कार्यक्षेत्रात नवीन उंची गाठू शकाल. व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी.
9 / 14
मंगळ ग्रहाचा वृश्चिक राशीतील प्रवेश तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ ठरू शकेल. या कालावधीत आक्रमकता वाढू शकेल. मात्र, यामुळे कुटुंबातील सदस्य किंवा मैत्रीच्या नात्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी. वाणीवर नियंत्रण ठेवावे. प्रॉपर्टी खरेदीच्या योजना पुढे ढकलणे योग्य ठरू शकेल. निष्काळजणीपणा टाळावा. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ ठरू शकेल.
10 / 14
मंगळ ग्रहाचा वृश्चिक राशीतील प्रवेश या राशीच्या व्यक्तींना मंगलमय ठरू शकेल. नवीन नोकरीच्या सुवर्ण संधी उपलब्ध होऊ शकतील. कुटुंबाची योग्य साथ लाभेल. विद्यार्थ्यांसाठी आगामी कालावधी चांगला ठरू शकेल. वादविवाद टाळावेत. मात्र, व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी.
11 / 14
मंगळ ग्रहाचा वृश्चिक राशीतील प्रवेश धनु राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकतो. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परदेशी जाण्याची योग्य संधी प्राप्त होऊ शकते. आर्थिक आघाडीवर योग्य निर्णय घ्यावेत. मान, सन्मान वाढतील. मानसिक तणाव वाढणाऱ्या घटना घडू शकतील.
12 / 14
मंगळ ग्रहाचा वृश्चिक राशीतील प्रवेश मकर राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकतो. व्यापारी, व्यवसायिकांना आगामी कालावधी शुभ लाभदायक ठरू शकेल. यश व प्रगतीचे मार्ग साध्य होऊ शकतील. आरोग्य सुधारेल. दाम्पत्य जीवनात सुधारणा होईल. नोकरीतील व्यक्तींना बढतीचे योग जुळून येऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ. मित्रांची योग्य साथ लाभेल.
13 / 14
मंगळ ग्रहाचा वृश्चिक राशीतील प्रवेश कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकेल. देणी वसूल होतील. अडकलेले पैसे मिळू शकतील. आर्थिक आघाडी मजबूत होऊ शकेल. मनोबल उंचावू शकेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. योग आणि ध्यानधारणा करणे उपयुक्त ठरू शकेल. रात्रीचे प्रवास टाळावेत. घाईने निर्णय घेऊ नयेत. रागावर नियंत्रण ठेवावे.
14 / 14
मंगळ ग्रहाचा वृश्चिक राशीतील प्रवेश मीन राशीच्या व्यक्तींना चांगला ठरू शकेल. ठरवलेली कामे पूर्णत्वाला जाऊ शकतील. कार्यक्षेत्रात कौतुक, प्रशंसा होऊ शकेल. कार्यक्षेत्रातील निर्णय योग्य ठरू शकतील. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होऊ शकतील. भावंडांशी असलेले नातेसंबंध सुधारतील. मन प्रफुल्लित होईल आणि सकारात्मकता येऊ शकेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य