numerology these 4 number get good benefits and dhan labh yoga in rare planetary position
Numerology: ‘या’ ४ मूलांकाच्या व्यक्तींना धनलाभाचे उत्तम योग; भाग्योदयासह फायदेशीर काळ By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 3:27 PM1 / 12ज्योतिषशास्त्राला आपल्याकडे मोठे महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखांपैकी एक महत्त्वाची शाखा म्हणजे अंकशास्त्र. अंकांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयीचे अंदाज आणि भविष्य कथन केले जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. (Numerology)2 / 12अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. 3 / 12एप्रिल महिन्यातील अद्भूत ग्रहस्थितीचा प्रभाव राशींसह मूलांकांवरही पडू शकते, असे सांगितले जाते. या एकाच महिन्यात सर्व नवग्रह आपापली स्थाने बदलणार आहेत. असा दुर्मिळ योग यापूर्वी कधी जुळून आला, याबाबत निश्चित सांगता येत नाही. या उत्तम ग्रहस्थितीचा कोणत्या मूलांकांच्या व्यक्तींना नेमका काय लाभ होऊ शकेल, ते जाणून घेऊया...4 / 12मूलांक १ असणाऱ्या लोकांना प्रेमसंबंधांमध्ये भाग्याची साथ मिळेल. खर्चांमध्ये वाढ आणि कार्यक्षेत्रात अडचणी येऊ शकतील. मन चिंताग्रस्त होऊ शकेल. भावनात्मक समस्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पाडू शकतात, असे म्हटले जात आहे. 5 / 12मूलांक २ असणाऱ्या लोकांना कार्यक्षेत्रामध्ये धनलाभ होण्याच्या शक्यता आहे. दाम्पत्य जीवन उत्तम राहू शकेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना शुभवार्ता मिळू शकेल. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. 6 / 12मूलांक ३ असणाऱ्या लोकांना या आठवड्यात आर्थिक बाबींमध्ये भाग्याची साथ मिळू शकेल. आपण घेत असलेल्या मेहनतीचा लाभ आगामी कालावधीत आपल्या मिळू शकेल. दाम्पत्य जीवन सामान्य राहू शकेल. मुलांची चिंता सतावू शकेल. 7 / 12मूलांक ४ असणारे लोक आपल्या प्रयत्नांमुळे आर्थिक लाभ मिळवण्यात यशस्वी ठरू शकतील. दाम्पत्य जीवनातील कुरबुरीमुळे नकारात्मकता वाढू शकेल. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. 8 / 12मूलांक ५ असणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी विशेष आनंदाची बातमी मिळू शकेल. व्यावसायिक प्रवासातून शुभवार्ता मिळू शकेल. मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत आनंददायी वेळ जाऊ शकेल. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी विचार करण्याचा सल्ला दिला जात आहे. 9 / 12मूलांक ६ असणाऱ्यांना आगामी कालावधीत आर्थिक लाभ हळूहळू प्राप्त होतील. प्रवासातून विशेष लाभ मिळाल्याने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्यांमुळे काहीशी निराशा येऊ शकेल. मनशांतीसाठी योगासने, ध्यानधारणा करणे उपयुक्त ठरू शकेल. 10 / 12मूलांक ७ असणाऱ्यांनी आगामी कालावधीत संयम बाळगावा. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासात विशेष काळजी घ्यावी. कालांतराने शुभवार्ता मिळू शकतील. कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगून कामे करणे उपयुक्त ठरू शकेल. 11 / 12मूलांक ८ असणाऱ्या व्यक्तींना आगामी काळात काही समस्या, अडचणी येण्याची शक्यता आहे. मात्र, विश्वासाने कार्यरत राहा. कालांतराने सर्व समस्यांचे निराकरण होण्याचा योग्य मार्ग सापडू शकेल. प्रवासात सावधगिरी बाळगावी. 12 / 12मूलांक ९ असणाऱ्यांनी आगामी कालावधीत कार्यक्षेत्रात काम करताना काळजी घ्यावी. पालकांकडून काही चांगली बातमी मिळेल. प्रेमप्रकरणात हळूहळू वाढ झाली तर यश मिळू शकेल. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications