शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gomed Ratna : राहूचा प्रकोप दूर करण्यासाठी गोमेद धारण करा, अशी करा खऱ्या रत्नाची पारख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 9:20 PM

1 / 8
रत्नशास्त्रात पुष्कराज, मोती, हिरा, माणिक, पाचू अशी अनेक रत्ने मुख्य रत्ने मानली गेली आहेत. यामध्ये गोमेद या रत्नाचा समावेश होतो. जर एखाद्या व्यक्तीवर राहूची दशा सुरू असेल तर त्याला गोमेद घालण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा लोक दागिन्याच्या स्वरूपातही गोमेद धारण करतात.
2 / 8
असं मानलं जातं की हे रत्न धारण केल्यानं रोगांपासून मुक्ती मिळते. चला तर मग जाणून घेऊया गोमेद परिधान करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कशी करता येईल गोमेदची पारख.
3 / 8
तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे गोमेद सापडतील. परंतु श्रीलंकेत आढणारा गोमेद गा सर्वोत्तम मानला जातो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेत सापडणारा गोमेद आहे.
4 / 8
याशिवाय भारतात हिमालय, हजारीबाग, काश्मीर आणि दक्षिण भारत या ठिकाणी गोमेद सापडतो. सर्वोत्कृष्ट गोमेद हा म्यानमारमध्ये सापडतो आणि तो किंचित तपकिरी रंगाचा असतो. परंतु म्यानमारचा गोमेद हा फार कमी ठिकाणी मिळतो.
5 / 8
गोमेद रत्नाची एक खासियत म्हणजे या रत्नाला लाकडाच्या भुशाने स्वच्छ केल्यास त्यात अधिक चमक येईल. त्याच वेळी, गोमेद बनावट असल्यास भूसा साफ केल्यानंतर त्याची चमक नाहीशी होते.
6 / 8
वृषभ, मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ लग्न आणि राशी असलेल्या लोकांना गोमेद धारण करता येतो. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत १,४,७,१० यापैकी कोणत्याही स्थानात राहू असेल तर त्यानं गोमेद धारण कारावा.तर राहू ५व्या आणि १०व्या घरात असला तरी गोमेद धारण करता येतो.
7 / 8
गोमेद धारण करण्यासाठी शनिवारी स्वाती, अर्दा आणि शततारका नक्षत्र उत्तम असतात. तुम्ही ते अष्टधातु किंवा चांदीच्या अंगठीत ५-६ रत्तीच्या वजनाचा गोमेद परीधन करू शकता.
8 / 8
ही अंगठी घालण्यापूर्वी दूध, गंगाजल, मध एकत्र करून ते चोवीस तास ठेवा. यानंतर ते धारण करताना ‘ओम रहवे नमः’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. अंगठी व्यतिरिक्त, जर तुम्ही तो तुमच्या गळ्यात घातला तर तुम्हाला अधिक फायदा होतो. टीप : कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष