Rahu Ketu Gochar 2022 :१२ एप्रिल रोजी राहू केतुचे स्थलांतर झाल्यामुळे 'पाच' राशींची सर्वार्थाने भरभराट होणार हे नक्की! By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 02:12 PM 2022-04-12T14:12:04+5:30 2022-04-12T14:17:21+5:30
Rahu Ketu Gochar 2022 :ज्योतिष शास्त्रानुसार अवकाशातील ग्रहांचा आपल्या दैनंदिन तसेच भविष्यातील घटनांवर दीर्घकाळ प्रभाव होत असतो. प्रत्येक ग्रहाचे वैशिष्ट्य वेगवेगळे असते. तसेच त्याचा राशींवर होणारा परिणाम प्रतिकूल आहे की अनुकूल ते दाखवतो. राहू-केतू ग्रहांचे संक्रमण ज्योतिषशास्त्रातील एक मोठी घटना आहे कारण ते १८ महिन्यांनी राशी बदलतात. त्यांच्या स्थितीतील बदलाचा प्रभाव लोकांच्या जीवनावर दीर्घकाळ टिकतो. या ग्रहांना पापी ग्रह असेही म्हणतात. मात्र त्यांच्या स्थलांतरामुळे पुढील पाच राशींचे पापग्रह दूर होऊन भरभरक्कम लाभ होणार आहे. १२ एप्रिल रोजी राहू-केतू संक्रमणाचा शुभ प्रभाव कोणत्या राशीच्या लोकांवर पडणार आहे त्याची माहिती घेऊया.
मेष : राहू आणि केतूचे संक्रमण मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम देईल. करिअरमध्ये प्रगती होईल. पगार वाढू शकतो. इतर मार्गानेही धनलाभ होईल. बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. काही सुरक्षित बचत ठेवीत पैसे गुंतवणे फायद्याचे ठरेल.
कर्क : कर्क राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण करिअर आणि बिझनेस दोन्हीसाठी चांगले सिद्ध होईल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. उत्पन्न वाढू शकते. पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल.
तूळ : तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंद, समृद्धी आणि सन्मान देणारा ठरेल. त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. भरपूर कमाई होईल. पैसे मिळवण्यासाठी तुम्ही नवीन मार्ग वापरून पाहू शकता. जर तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले तर यश नक्की मिळेल.
धनु : धनु राशीच्या लोकांना हे संक्रमण चांगले आर्थिक लाभ देईल. ते भरपूर कमावतील पण खर्चही वाढतील. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. जीवनात आनंद दार ठोठावेल.
मकर : राहू-केतूचे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठीही शुभ राहील. त्यांचे उत्पन्न वाढेल. आईकडून पैसा मिळू शकतो. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा राहण्याच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. नवीन कार्यक्षेत्रात मुसंडी माराल.