Raksha Bandhan 2020: Be careful about these 6 mistakes during celebrate rakhi
Raksha Bandhan: राखी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या; 'या' वेळेत साजरा करा रक्षाबंधनाचा सोहळा! By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 03:10 PM2020-08-02T15:10:50+5:302020-08-02T15:35:45+5:30Join usJoin usNext राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट नात्याचा सणं. उद्या म्हणजेचं ३ ऑगस्ट रोजी सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. हा सण साजरा करण्यासाठी सर्वांच्या बहिणीची आजपासूनचं तयार सुरू झाली असेल. यंदा लॉकडाऊन असल्यामुळे फारसा उत्साहात नाही पण घरच्याघरी बहिण भाऊ आपला आनंद नक्की साजरा करतील. ज्याोतीषी कमल नंदलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी आयुष्मान योग असणार आहे. ज्यामुळे बहिणीला आणि भावला दीर्घायुष्य लाभेल रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त उद्या 9 वाजून २५ मिनिटांनी सुरू होणार असून ११ वाजून २८ मिनिटांपर्यंत असेल. ज्यांना संध्याकाळच्यावेळी राखी बांधायची आहे. त्यांच्यासाठी ३ वाजून ५० मिनिटांपासून ५ वाजून १५ मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त असेल. या कालावधीत राखी बांधू नका: सकाळी ५ वाजून ४४ मिनिटांपासून ९ वाजून २५ मिनिटांपर्यंत अशुभ वेळ आहे. या कालावधीत राखी बांधणं टाळा. याशिवाय सकाळी ७ वाजून २५ मिनिटांपासून ९ वाजून ५ मिनिटांपर्यंत अशुभ वेळ असणार आहे. या कालावधीत राखी बांधू नका. कारण यावेळात राहू काळ असणार आहे. तिसरी अशुभवेळ ११ वाजून २८ मिनिटांपासून १ वाजून दुपारी १ वाजून ७ मिनिटांपर्यंत असेल. यावेळी राखी बांधण्याचा कार्यक्रम करू नका. त्यानंतर २ वाजून ८ मिनिटांपासून ३ वाजून ५० मिनिटांपर्यंत अशुभ वेळ असल्याने या कालावधीत राखी बांधू नका. (Image Credit: Reuters)Read in Englishटॅग्स :रक्षाबंधनजरा हटकेRaksha BandhanJara hatke