शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Raksha Bandhan 2021 : वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील 'या' वस्तूंना राखी बांधायला विसरू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 8:00 AM

1 / 6
बाळकृष्णाला आपण राखी बांधतोच, ज्या वास्तूत तो राहतो, त्या देव्हाऱ्याला राखी बांधावी. कारण आपले घर जशी आपली वास्तू आहे तशी देवघर ही देवाची वास्तू आहे. देवांची गैरसोय होऊ नये, अशा पद्धतीने ती छोटीशी जागा देवांसाठी अनुकूल स्थान निर्माण करते. म्हणून देवघराला राखी बांधावी.
2 / 6
बँकेत आपण पैसे जमा करतो, परंतु अडी अडचणीच्या काळात लागणारी रक्कम घरातल्या तिजोरीत ठेवतो. आपल्या मेहनतीच्या पैशांचे संरक्षण करणारी तिजोरी, आपले दागदागिने सांभाळणारी तिजोरी आपल्या काळजीचा भार हलका करते. तिच्यात असलेला ऐवज दुप्पट, चौपट व्हावा यादृष्टीनेही तिला राखी बांधून अभिष्टचिंतन करता येते.
3 / 6
आपण घरात सुरक्षित असतो, कारण घराचे दार सगळी संकटं बाहेर थोपवून ठेवते. म्हणून दरवाजाच्या कडीला राखी बांधावी आणि आपले सदैव संरक्षण त्याने करावे अशी प्रार्थना करावी.
4 / 6
दसऱ्याच्या दिवशी आपण यंत्रपूजा करतो, त्याचप्रमाणे रक्षा बंधनाच्या दिवशी आपल्या नेहमीच्या वापरात असलेल्या यंत्राला राखी बांधावी. कारण त्याच्यावर आपली मदार असते. जसे की लॉकडाऊन काळात संगणकाने आपल्याला जी साथ दिली ती पाहता राखी बांधून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल.
5 / 6
एक वेळ माणसं बेसावध असतील, पण प्राणी नेहमी सावध असतात. म्हणून वास्तुशास्त्र सांगते आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना राखी बांधून त्यांचा सन्मान करा व त्यांनी आजवर केलेल्या निष्काम प्रेमाबद्दल त्यांचे आभार माना.
6 / 6
आपल्याला सावली देणारे, फळ फुलं देणारे आणि दूषित वायूपासून आपले संरक्षण करणारे वृक्ष हे देखील राखीचे मानकरी आहेत. वृक्षाच्या खोडाला नाही, पण एखाद्या डहाळीला प्रेमाने राखी बांधून त्यांच्या संरक्षणाची आणि जतन करण्याची जबाबदारी स्वीकारा.
टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनShravan Specialश्रावण स्पेशल