saturn transit aquarius 2022 meen rashi shani sade sati starts and dhanu rashi ends in the year 2022
Shani Sade Sati 2022: शनीचा कुंभ प्रवेश: मीन राशीच्या व्यक्तींची साडेसाती सुरु; धनु राशीची मुक्तता, ‘असा’ असेल प्रभाव By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 2:05 PM1 / 15भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये ज्योतिष, पंचांग, राशीभविष्य यांना अत्याधिक महत्त्व आहे. दररोज सकाळी उठून आपले सर्वप्रथम आपले भविष्य पाहणारे कोट्यवधी लोकं आहेत. ज्योतिष आणि भविष्यावर अगाध श्रद्धा असणारी माणसे योग, ग्रह, साडेसाती यांची माहिती वारंवार घेत असतात. (Shani Sade Sati 2022)2 / 15एप्रिल महिना ज्योतिषीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. कारण सर्व नवग्रहांनी एकाच महिन्यात आपापली स्थाने बदलली. असा दुर्मिळ योग क्वचितच येतो. यातील सर्वांत महत्त्वाच्या ग्रहाचा राशीबदल म्हणजे नवग्रहातील न्यायाधीश शनी. (Shani Sade Sati 2022 in Marathi)3 / 15शनी हा ग्रह न्यायदान करणार, कर्मकारक ग्रह आहे. शनीच्या कृपाकटाक्षाने अनेकांचा किंबहुना प्रत्येकाचा भाग्योदय होत असतो. त्याचे प्रधान कारण शनी व गुरु या ग्रहांच्या सहकार्याशिवाय कोणतेही कर्म करणे शक्य होत नाही, असे सांगितले जाते. (Saturn Transit April 2022)4 / 15आताच्या घडीला धनु, मकर आणि कुंभ या तीन राशीचा साडेसाती काळ सुरू आहे. मात्र, २९ एप्रिल २०२२ नंतर यामध्ये बदल होईल. कारण शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे धनु राशीचा साडेसातीचा काळ संपुष्टात येईल. तर, मीन राशीची साडेसाती सुरू होईल. (Meen Rashi Shani Sade Sati 2022)5 / 15दुसरीकडे, मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल आणि कुंभ राशीचा मधला टप्पा सुरू होणार आहे. मात्र, ही स्थिती तीन महिन्यांपर्यंत असेल. याचे कारण तीन महिन्यांनी म्हणजेच १२ जुलैच्या दरम्यान शनी वक्री मार्गाने पुन्हा मकर राशीत येईल. (Pisces Zodiac Sign Shani Sade Sati 2022)6 / 15शनीच्या या वक्री मार्गामुळे पुढील सुमारे सहा महिन्यांचा काळ म्हणजेच १७ जानेवारी २०२३ पर्यंत पुन्हा एकदा धनु राशीचा साडेसातीचा काळ सुरू होईल. परंतु, १७ जानेवारी २०२३ नंतर धनु राशीची साडेसाती खऱ्या अर्थाने संपुष्टात येईल. याच सहा महिन्याच्या कालावधीत मीन राशीला साडेसातीपासून काहीसा दिलासा मिळेल. 7 / 15शनी ग्रहाच्या १७ जानेवारी २०२३ नंतर राशीबदलानंतर मीन राशीची साडेसाती पुन्हा प्रामुख्याने सुरू होईल. धनु राशीनंतर मकर राशीची साडेसाती संपुष्टात येण्यासाठी २०२५ वर्ष उजाडेल. त्यामुळे सन २०२२ मध्ये शनीच्या राशीबदलामुळे खूप मोठा प्रभाव या तीन राशींसह अन्य राशींवर पडेल, असे सांगितले जात आहे.8 / 15आपली साडेसाती सुरू होणार असल्याचे समजते, तेव्हा जणू काही आपणावर संकट ओढावणार आहे, असा आपला समज होतो. प्रत्यक्षात साडेसाती येणे ही एक प्रक्रिया आहे. साडेसाती केव्हा येते, ते पहाणे गरजेचे आहे. समजा आपली जन्म रास तूळ आहे. तर कन्या-तूळ -वृश्चिक राशीतून होणारे शनिचे भ्रमण आपणास साडेसाती आणणारे ठरणार आहे, म्हणजे राशीस बारावा-पहिला-दुसरा शनी असताना साडेसाती असते.9 / 15साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे. साडेसातीचा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र व गोचरी शनि यांच्याशी निगडित आहे. चंद्रापासून ४५ अंश मागे शनिचे अंशात्मक भ्रमण सुरू होते, तेव्हा साडेसाती सुरू होते व चंद्रापासून ४५ अंशापुढे शनी गेला की साडेसाती संपते.10 / 15सर्वसाधारण जन्मकुंडलीतील चंद्राच्या बाराव्या राशीत शनिने प्रवेश केला की, साडेसाती सुरू होते. ही पहिली अडीच वर्षे असतात. चंद्रराशीवरून शनिचे भ्रमण सुरू झाले की, दुसरी अडीच वर्षे व चंद्राच्या दुसऱ्या राशीत शनिने प्रवेश केला की, तिसरी अडीच वर्षे सुरू होतात. असा हा सर्व मिळून साडेसात वर्षांचा काळ म्हणून यास साडेसाती असे म्हणतात.11 / 15साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. तसेच शनीची उपासना, स्तोत्र पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात.12 / 15दुसरीकडे, आताच्या घडीला मिथुन आणि तूळ राशीवर ढिय्या प्रभाव सुरू आहे. २९ एप्रिल २०२२ नंतर मिथुन आणि तूळ राशीवरील ढिय्या प्रभाव संपुष्टात येईल. मात्र, शनीच्या वक्री चलनामुळे साडेसातीप्रमाणे जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंत पुन्हा ढिय्या प्रभाव राहील. तो जानेवारी २०२३ नंतर पूर्णपणे संपुष्टात येईल.13 / 15सन २०२२ मध्ये कर्क आणि वृश्चिक राशीवर ढिय्या प्रभाव असेल. जानेवारी २०२३ मध्ये तो पूर्णपणे लागू होईल. २९ मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे.14 / 15धनु आणि मीन या दोन्ही राशींचा स्वामी गुरु आहे. गुरु आणि शनी मित्र ग्रह मानले जातात. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो. करावे तसे भरावे या उक्तीनुसार शनी आपल्या कर्माचे फळ देत असतो, असे सांगितले जाते. 15 / 15शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications