शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 02:16 PM2024-11-30T14:16:29+5:302024-11-30T14:27:07+5:30

शुक्राचे होत असलेले राशीपरिवर्तन आणि नक्षत्र गोचर अनेक राशींसाठी सर्वोत्तम लाभ, सकारात्मक अनुकूलता देणारे ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला शुक्र ग्रह गोचर करणार आहे. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात शुक्र ग्रह दोन वेळा राशीपरिवर्तन करणार आहे. सर्वप्रथम शुक्र धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर मकर राशीतून कुंभ राशीत विराजमान होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर शुक्र आणि शनीचा युती योग जुळून येणार आहे.

तत्पूर्वी, शुक्र २९ नोव्हेंबर रोजी शुक्र नक्षत्र गोचर करत आहे. उत्तराषाढा नक्षत्रात गोचर करत आहे. ११ डिसेंबरपर्यंत शुक्र उत्तराषाढा नक्षत्राच्या या चरणात विराजमान असेल. या याचा स्वामी सूर्य असल्याचे सांगितले जात आहे. तसेच शुक्र आणि शनी यांचा अर्धकेंद्र दृष्टी योग जुळून येत आहे.

डिसेंबर महिन्यात शुक्राचे सुरुवातीला होणारे गोचर आणि नक्षत्र परिवर्तन तसेच शनीसोबतचा योग अनेक राशींसाठी सर्वोत्तम, विशेष लाभ, यश-प्रगती, आर्थिक वृद्धीसाठी सकारात्मक अनुकूलता देणारा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: आर्थिक लाभ मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नशीब पूर्ण साथ देईल. कामाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात फायदा होणार आहे. बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.

वृषभ: आनंददायी घटना घडू शकतात. पाठिंबा मिळू शकतो. पगारवाढीची शक्यता आहे. लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकता. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. नोकरीच्या शोधात असाल तर यश मिळू शकेल. मानसिक तणावातून दिलासा मिळू शकतो. सुख आणि शांतता लाभू शकेल. काही चांगली बातमी मिळू शकते.

मिथुन: अपेक्षित यश न मिळाल्याने तुम्ही थोडे चिंतेत राहू शकता. कालांतराने उत्तम यश मिळू लागेल. मित्र आणि कुटुंब तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. कुटुंबाच्या पाठिंब्याने अनेक समस्यांना सहजपणे तोंड देऊ शकाल. खाण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनचर्या यांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

कर्क: चांगली बातमी मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे यश मिळवू शकतात. यासोबत बक्षीस मिळू शकते. यामुळे कुटुंबात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. कौटुंबिक जीवनात आनंद मिळू शकेल. लव्ह लाइफ चांगली होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल.

कन्या: दीर्घकालीन प्रयत्नांमध्ये यश मिळवू शकतात. याद्वारे उत्तम नोकरीच्या संधी मिळू शकतात. भरपूर पैसे कमवू शकता. व्यवसायात फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. लव्ह लाइफ चांगले जाऊ शकेल. जोडीदारासोबत चांगला समन्वय निर्माण होईल.

तूळ: नोकरदारांना जीवनात मोठा बदल दिसू शकतो. मित्राच्या किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळेल. नोकरदार महिलांसाठी हा काळ शुभ ठरू शकेल. आर्थिक लाभ मिळवण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवन आनंदात जाईल.

वृश्चिक: उत्तमोत्तम संधी मिळू शकतील. कुटुंबाकडून, विशेषतः वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षा स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. नोकरदार लोकांना इच्छित पदोन्नती किंवा बदली मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. प्रिय जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.

धनु: महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी बरीच धावपळ करावी लागू शकते. प्रिय मित्र किंवा काही प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होईल. व्यवसायाच्या संदर्भात केलेल्या प्रवासामुळे नफा मिळू शकेल. सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कुटुंबासोबत पर्यटनस्थळी जाण्याचा प्लॅन करू शकता.

मकर: विशेष कृपा होऊ शकते. प्रवास करावा लगू शकेल. करिअर क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात. परिश्रमाच्या बळावर यश मिळवू शकता. पगारात वाढ होऊ शकते. व्यवसायाच्या क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात. क्षमतेच्या जोरावर बऱ्यापैकी फायदे मिळू शकतात. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील.

मीन: लाभदायक सिद्ध होऊ शकते. आत्मनिरीक्षण करता येईल. स्वतःकडे थोडे लक्ष देण्याची वेळ आहे. काही बदल करणे आवश्यक ठरू शकेल. कामात अफाट यश मिळवू शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. कामात शंभर टक्के द्याल. जीवनात सुख-शांतता लाभू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.