शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सूर्याचा गुरु राशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींना तेजोमय यश, उत्तम संधी; मीन संक्रांतीत शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 11:29 AM

1 / 9
मार्च महिन्यातील एकाच आठवड्यात सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्र राशीपरिवर्तन करणार आहेत. यापैकी नवग्रहांचा राजा मानला गेलेला रवि म्हणजेच सूर्य शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीतून १५ मार्च रोजी गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या मीन राशीतील संक्रमणाला मीन संक्रांती म्हटले जाते.
2 / 9
सूर्य सुमारे महिनाभर मीन राशीत असेल. एप्रिल महिन्यात सूर्य मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करेल. सूर्यासह मीन राशीत बुधही विराजमान असेल. यामुळे बुधादित्य योग जुळून येत आहे. याशिवाय नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रहही स्वराशीत विराजमान आहे. त्यामुळे सूर्य, बुध आणि गुरुचा त्रिग्रही योग जुळून येत आहे.
3 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु आणि सूर्य मित्र ग्रह मानले गेले आहेत. अशा परिस्थितीत सूर्याचे हे संक्रमण ५ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मकता आणेल. या काळात ५ राशीच्या राशीच्या लोकांची कारकीर्द खूप चमकेल. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात खूप आनंददायी घटना घडू शकतील, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना मीन संक्रांती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकेल. या काळात मालमत्ता किंवा वाहन लाभ मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत, हे संक्रमण खूप अनुकूल सिद्ध होऊ शकेल. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. दाम्पत्य जीवन सुखकारक होऊ शकते. आनंदवार्ता मिळू शकते.
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना मीन संक्रांतीचा काळ खूप अनुकूल ठरू शकेल. करिअरमध्ये प्रसिद्धी मिळू शकेल. स्वत:ला सिद्ध करण्यास सक्षम असाल. तशा संधी मिळू शकतील. जे सरकारी संस्थांशी संबंधित आहेत त्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. भावंडांसोबत व्यवसाय सुरू करण्याची योजना करू शकता. त्यांच्या सहकार्याचा लाभ मिळू शकेल.
6 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना मीन संक्रांती अनुकूल ठरू शकेल. अध्यात्मात अधिक रस राहील. वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तीर्थयात्रेला जाण्याचा विचारही करू शकता. इतरांवर प्रभाव टाकण्यास सक्षम असाल. कामाच्या ठिकाणी हितशत्रूंच्या कारवाया निष्प्रभ ठरू शकतील. व्यावसायिकदृष्ट्या हा काळ चांगला राहू शकेल.
7 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याची मीन संक्रांती आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरू शकेल.पगार वाढू शकेल. हा काळ फलदायी ठरू शकेल. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला राहू शकेल. मोठे यश मिळण्याची दाट शक्यता आहे. लक्ष ध्येयांवर अधिक असेल. ज्या नोकरदारांना नोकरी बदलण्याची इच्छा आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.
8 / 9
मीन राशीत सूर्याचे आगमन होत आहे. या राशीत गुरु, बुधही असणार आहेत. अशा परिस्थितीत निर्णयक्षमता खूप प्रभावी ठरणार आहे. या काळात इतर लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. यावेळी सल्ला देणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीकडे दुर्लक्ष करू नका. सरकारी कामातही यश मिळू शकेल. कामाच्या ठिकाणीही वेळ खूप सकारात्मक असेल. बढती मिळू शकते.
9 / 9
मार्च महिन्याच्या मध्यात मीन राशीत विराजमान असलेला शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करत आहे. गुढी पाडव्याला ४ ग्रहांचा अद्भूत योगही जुळून येत आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य