शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुक्र गोचर: ‘या’ ८ राशींना अपार लाभ, उत्तम यश; राहुशी युती शुभ करेल! तुमची रास कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 1:43 PM

1 / 15
मार्च महिन्याच्या या एका आठवड्यात सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्र राशीपरिवर्तन करत आहे. यातील शुक्राचे राशीपरिवर्तन अनेकार्थाने महत्त्वाचे मानले जात आहे. आताच्या घडीला गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत विराजमान असलेला शुक्र ग्रह होळीनंतर मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. १२ मार्च रोजी शुक्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. एप्रिल महिन्यात शुक्र स्वराशीत प्रवेश करणार आहे. (venus transit in aries 2023)
2 / 15
शुक्राचा मेष राशीत विराजमान असलेल्या तसेच छाया, क्रूर ग्रह मानल्या गेलेल्या राहुसोबत युती योग जुळून येईल. रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला आहे. (shukra gochar mesh rashi 2023)
3 / 15
शुक्राचा गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत होत असलेला प्रवेश तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना याचा लाभ मिळू शकेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल? ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीत शुक्राच्या प्रवेशानंतर राहु-शुक्र युती योग जुळून येत आहे. या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ शुभ प्रभावाचा ठरू शकेल. सुखसोयी वाढू शकतील. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सुधारतील. प्रेम जीवन अनुकूल असेल. जोडीदाराशी सर्व मुद्द्यांवर सहमती असेल. लव्ह लाईफमध्ये प्रेम राहू शकेल.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मेष प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. खर्च प्रचंड वाढू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रेमप्रकरणातही वाद होऊ शकतात. तिसर्‍या व्यक्तीमुळे परस्पर संबंधांवर परिणाम होऊ शकतो. सावधगिरी बाळगून कृती करणे हिताचे ठरू शकेल.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मेष प्रवेश शुभ आणि लाभदायक ठरू शकेल. आर्थिक स्थितीही मजबूत होऊ शकेल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी लाभाचा काळ असून, व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. लव्ह लाईफमध्ये रोमांस वाढू शकेल. मुलांबद्दल चांगली बातमी मिळू शकेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मेष प्रवेश नोकरदारांसाठी विशेष फायदेशीर ठरू शकेल. महिलांना विशेष लाभ मिळू शकतो. कॉस्मेटिक वस्तूंचा व्यवसाय करणारे चांगले नफा कमावू शकतील. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. घराच्या नूतनीकरणावर पैसे खर्च करू शकता. कौटुंबिक जीवन आनंदाने भरलेले असेल.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मेष प्रवेश लाभदायक ठरू शकेल. करिअरमध्ये विशेष यश मिळू शकते. विवाहित लोकांसाठी हे गोचर अतिशय शुभ राहू शकेल. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत आहेत ते योजनांनुसार पुढे जाऊ शकतात. नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली ऑफर मिळू शकते.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मेष प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. अधिक खर्चाला सामोरे जावे लागू शकते. काही खर्च इच्छा नसतानाही करावे लागतील. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. आर्थिक स्थिती चांगली असल्याने प्रत्येक अडचणीला खंबीरपणे सामोरे जाल. सासरच्या मंडळींशी संबंध दृढ होतील.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मेष प्रवेश जीवनात आनंद आणणारा ठरू शकेल. प्रेमप्रकरणासाठीही अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद मिळेल. आरोग्य चांगले राहू शकेल. व्यक्तिमत्त्व अधिक सुधारू शकेल.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मेष प्रवेश संमिश्र परिणाम देणारे सिद्ध होऊ शकतो. जोडीदारासोबत अनावश्यक वादात अडकू शकता. गैरसमजामुळे नात्यात तणाव वाढू शकतो. आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला दिला जातो. वैद्यकीय उपचारांसाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मेष प्रवेश शुभ सिद्ध होऊ शकेल. विशेषत: विद्यार्थ्यांना मोठे यश मिळण्याची अपेक्षा आहे. चांगली बातमी मिळू शकते. जुना वाद सोडवला जाऊ शकतो. आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल. वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमवण्याचा विचार करू शकता. यश मिळू शकेल. नोकरदारांना बढती मिळू शकते.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मेष प्रवेश अतिशय अनुकूल राहू शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हे गोचर शुभ सिद्ध होईल. आईसोबत नाते घट्ट होऊ शकेल. चैनीच्या वस्तू आणि सुविधांवर खर्च करू शकाल. एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. प्रोफेशनल लाइफसाठी हा काळ चांगला आहे. नवीन संधींसोबत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मेष प्रवेश खूप शुभ मानले जात आहे. भावंडांशी तुमचे संबंध सुधारतील. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ शुभ राहील. छंद पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश मिळेल. देवावरील श्रद्धा आणखी वाढू शकेल.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मेष प्रवेश संमिश्र प्रभाव ठरू शकेल. पैसे वाचवू शकाल. जोडीदारासोबत मिळून नवीन काम सुरू करू शकता. सासरच्या मंडळींशी संबंध चांगले राहतील. व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. लोक तुमचे म्हणणे संयमाने ऐकून घेऊ शकतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य