Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १२ मार्च २०२३ ते १८ मार्च २०२३: ‘या’ ६ राशींना उत्तम आठवडा, अडकलेले पैसे मिळतील; नोकरी-व्यापारात लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 12:02 PM2023-03-12T12:02:27+5:302023-03-12T12:34:20+5:30

Weekly Horoscope: मार्च महिन्याचा आगामी आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

मार्च महिना अनेकार्थाने विशेष ठरणारा आहे. मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा जवळ येत आहे. गुढीपाडव्याशिवाय, चैत्र नवरात्र, श्रीराम नवमी असे अनेक सण-उत्सव आगामी काळात साजरे केले जात आहेत. मार्च महिन्यातील या आठवड्याच्या शेवटी पापमोचनी एकादशी साजरी केली जाईल.

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा सेनापती मंगळ या आठवड्यात वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. तसेच शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. नवग्रहांचा राजा रवि म्हणजेच सूर्य कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. तर, नवग्रहांचा राजकुमार बुध मीन राशीत प्रवेश करेल.

मार्च महिन्यातील या एका आठवड्यात नवग्रहांपैकी चार महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करत आहेत. याचा सर्व राशींवर प्रभाव पडेल, असे सांगितले जात आहे. तुमच्यासाठी कसा असेल आठवडा? कोणत्या राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकतील? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय काळजी घ्यावी? जाणून घेऊया...

मेष: या आठवड्यात आपण काही कारणाने चिंतीत असल्याचे दिसेल. भावनाशील न होता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. नोकरीत आपणास चांगली पगारवाढ मिळण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना पूर्वी केलेल्या प्रयत्नांचा लाभ मिळेल. एखाद्या महिला मित्रामुळे लाभ संभवतो. विद्यार्थ्यांवर या आठवड्यात अभ्यासाचा ताण राहील. मेहनत वाढवावी लागेल. आरोग्याविषयी काहीसे चिंतीत राहू शकाल. आठवड्याचा तिसरा व चौथा दिवस प्रवासास अनुकूल आहे.

वृषभ: या आठवड्यात आपण खूप विचलित असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जीवनात एकमेकांशी जवळीक वाढेल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. नोकरीत सुद्धा चढ - उतार येतील. कामाच्या पद्धतीत बदल घडून येईल. नोकरीच्या बाबतीत आपण काहीसे चिंतीत व्हाल. व्यापारात यश प्राप्ती होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चढ - उतारांचा आहे. अभ्यासाकडे अतिरिक्त लक्ष देण्याची गरज भासेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मिथुन: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल काळ आहे. कार्यक्षेत्रात वरिष्ठांना प्रभावित करण्यात आपण कोठेही कमी पडणार नाही. व्यापाऱ्यांना कामात चांगली स्थिती असल्याचे दिसू लागेल. मेहनत यशस्वी झाल्याने व्यापाराची व्याप्ती वाढेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करू शकतील. चांगले परिणाम मिळतील.

कर्क: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. जोडीदाराचा पाठिंबा मिळू शकेल. कुटुंबियात काही वाद संभवतात. त्याचा प्रभाव आपल्या कामगिरीवर होईल. सावध राहून कामे करावीत. सहकाऱ्यांशी नीट वागावे. कोणालाही आपल्याविषयी तक्रार करण्यास वाव असणार नाही याची काळजी घ्यावी. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चढ-उतारांचा आहे. कोणतीही नवीन गुंतवणूक करू नये. जुन्या योजनांची अंमल बजावणी करण्याचा विचार करू शकता. त्याचा आपणास फायदा होऊ शकतो. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सामान्यच आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

सिंह: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. जोडीदाराशी असलेला समन्वय बिघडू शकतो. मित्रांसह मौजमजा करण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी नीट वागा. त्याचा फायदा आगामी काळात आपणास बघावयास मिळेल. व्यापाऱ्यांना समजूतदारपणा दाखवावा लागेल. घाईघाईत कोणतेही असे कृत्य करू नका, ज्यामुळे ते आपल्या अंगाशी येईल. व्यापारात पारदर्शकता ठेवावी. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमू शकेल. मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. आहारावर नियंत्रण ठेवावे. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कन्या: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. या आठवड्यात आपल्या खर्चात वाढ होईल. प्राप्ती सामान्यच राहील. पैश्यांचा सदुपयोग करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कोणालाही कटू शब्द बोलू नये. कौटुंबिक संबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. प्रयत्न करूनच आपण यशस्वी होऊ शकाल. बदली होण्याची संभावना आहे. कामाचा आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांना या आठवड्यात अभ्यासातील समस्यांना सामोरे जावे लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे.

तूळ: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. जोडीदाराशी उत्तम समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा. नोकरीत चढ - उतार येतील. कामावर लक्ष केंद्रित करावे. उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा. व्यापारासाठी आठवडा खूपच अनुकूल आहे. आपणास एखाद्या मित्राचा पाठिंबा मिळेल. व्यापारात यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

वृश्चिक: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. कौटुंबिक समस्या मन चिंतीत करेल. त्यामुळे काहीसे व्याकुळ व्हाल. आठवड्याच्या सुरुवातीस किरकोळ खर्च होतील. त्यानंतर स्थिती नियंत्रणात येईल. प्राप्तीत वृद्धी होऊ शकते. अडकलेला पैसा मिळू शकतो. नोकरीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून ते चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल. फायनान्स व फाईन आर्टस् चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक अनुकूल परिणाम प्राप्त होतील. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

धनु: हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. ते आपणास खाली मान घालावयास लावण्याचा प्रयत्न करू शकतील. तसेच कामात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतील. सावध राहावे. विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल. स्पर्धेत यशस्वी होऊ शकाल. आठवड्याचे सुरुवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मकर: हा आठवडा आपल्यासाठी चढ-उतारांचा आहे. कौटुंबिक समस्या आपणास आडव्या येऊ शकतात. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. मित्रांसह मौजमजा करण्याची संधी मिळेल. एखादे उपकरण खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्यांना कामाकडे लक्ष द्यावे लागेल. निष्काळजीमुळे ताकीद मिळू शकते. सावध राहावे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल असला तरी नियमांविरुद्ध काम करणे नुकसानदायी ठरू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची इच्छा होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कुंभ: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. नशिबाची साथ मिळेल. कामे यशस्वी होतील. कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. एखादा दूरवरचा प्रवास करू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. मेहनत करावीच लागेल. व्यापाऱ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल. विद्यार्थ्यांना संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे लागेल. काही लोकांची संगत अभ्यासात अडथळा निर्माण करण्याची संभावना आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मीन: आठवड्याची सुरवात आपल्यासाठी काहीशी प्रतिकूल असू शकते. पण आठवड्याच्या सुरुवातीनंतरचे दिवस चांगले होऊ शकतील. चांगले लाभ मिळतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदारासह फिरावयास जाऊ शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. प्रगतीची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाने संतुष्ट होतील. यश प्राप्त होईल. व्यापाराची वृद्धी करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. प्रयत्नांना गती द्यावी, म्हणजे व्यापार गतिमान होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात काही अडचणी येतील. अभ्यासात खंड पडू शकतो. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.