Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २६ फेब्रुवारी २०२३ ते ०४ मार्च २०२३: ‘या’ ८ राशींना शानदार, यश-प्रगती-पैसा अपार; मार्चची सुरुवात दमदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 04:02 PM2023-02-26T16:02:54+5:302023-02-26T16:34:09+5:30

Weekly Horoscope: मार्च महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

फेब्रुवारी महिन्याची सांगता होत आहे आणि मार्च महिन्याला सुरुवात होत आहे. फेब्रुवारी महिना ज्योतिषीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा ठरला. या महिन्यात अनेक दुर्मिळ अद्भूत तसेच शुभ योग जुळून आले. याचा प्रभाव सर्व राशींवर पाहायला मिळाला. या महिन्याच्या अखेरीस बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. तसेच कुंभ राशीत प्रवेश करताच तो अस्तंगत होणार आहे.

बुधाचा कुंभ राशीतील प्रवेश आणि अस्तंगत होणे महत्त्वाचे मानले जात आहे. याशिवाय विशेष म्हणजे मार्च महिन्यात बुध दोनवेळा राशीपरिवर्तन करणार आहे. बुध ग्रहासह मार्च महिन्यात मंगळ, शुक्र आणि रवि राशीपरिवर्तन करणार आहे. याशिवाय होळी, गुढीपाडवा, श्रीराम नवमी, चैत्र नवरात्र यांसारखे सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत.

ज्योतिषीय, सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या शुभ मानल्या जात असलेल्या मार्च महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल, मार्च महिन्याचा पहिला आठवड्यात तुमच्यावरील प्रभाव कसा असेल, जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

मेष: हा आठवडा नवीन आनंददायी बातमी घेऊन येणारा आहे. आपणास धनप्राप्ती झाल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आपली अनेक प्रलंबित कामे पूर्णत्वास गेल्याने आपले मन हर्षित होईल. नोकरदारांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. तेव्हा सावध राहावे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात वृद्धी झाल्याचे दिसून येईल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील.

वृषभ: या आठवड्याची सुरुवात फायदेशीर असेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात रोमांस वाढेल. प्राप्तीत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येईल. नवीन गुंतवणूक सुद्धा करू शकाल. काही बचत योजनांमध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकाल. नोकरी करणाऱ्यांना तणावास सामोरे जावे लागेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अत्यंत अनुकूल आहे. काही नवीन लोकांचे सहकार्य मिळू शकते. भावंडांचे सहकार्य आपणास मिळू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. मेहनत यशस्वी होईल.

मिथुन: सुरुवात काहीशी प्रतिकूल होईल. वैवाहिक जीवनातील स्थिती उत्तम. समजूतदारपणा व सामंजस्यामुळे नाते अधिक मधुर कराल. कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. व्यापारी आपल्या कामास गती येण्यासाठी काही आऊटसोर्सिंग कामाची मदत घेऊ शकतात. कार्यक्षेत्रातील वातावरण हलके करण्याचा प्रयत्न कराल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य सुद्धा मिळेल. नशिबाची साथ मिळू शकेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सामान्यच आहे. वाहन जपून चालवावे.एखादी जुनी समस्या सुद्धा दूर होईल.

कर्क: हा आठवडा खूप आनंददायी बातमी घेऊन येणारा आहे. प्रेमीजनांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली होईल. सौख्य प्राप्ती होईल. प्राप्तीत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येईल, काही पूर्व योजना लाभाचा मार्ग निर्माण करतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपले वरिष्ठ आपल्या बाजूने उभे राहिल्याने आत्मविश्वास उंचावेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा उत्तम आहे. काही लोकांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना आपल्या अध्ययनावर लक्ष द्यावे लागेल.

सिंह: हा आठवडा अनुकूल आहे. जोडीदाराशी जवळीक साधून त्यांचे हृदय जिंकण्यात यशस्वी व्हाल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत यश प्राप्ती होईल. नोकरीत चांगली पगारवाढ संभवते. वरिष्ठांशी आपले संबंध सुधारतील. काही किरकोळ खर्च होतील. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. विद्यार्थी अध्ययनाचा आनंद घेऊ शकतील. त्यांना त्याचे चांगले परिणाम मिळतील.

कन्या: हा आठवडा चांगला आहे. दांपत्य जीवन सुखावह होईल. प्रेमिकेशी नाते अधिक दृढ होईल. नवनवीन गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न कराल. जमीन - जुमल्याचा लाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती उत्तम असेल. बढती मिळण्याची संभावना आहे. नोकरी बदलावयाची असेल तर त्यात यश प्राप्त होईल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. आपले प्रयत्न यशस्वी होऊन आपणास लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेत घेत खूप मेहनत करतील. आहारावर नियंत्रण ठेवावे. तेलकट व मसालेदार पदार्थ टाळणे आपल्यासाठी हितावह होईल.

तूळ: हा आठवडा काही आव्हाने घेऊन येणारा आहे. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. धनहानी व नुकसान होण्याची संभावना आहे. मात्र, त्यानंतर परिस्थती एकदम चांगली होईल. अचानक धनलाभ संभवतो. मित्रांपासून थोडे सावध राहावे. नोकरीकडे लक्ष द्यावे. कामानिमित्त प्रवास संभवतो. व्यापारात सावध राहावे लागेल. शासनाविरुद्ध जाऊन एखादे काम करणे नुकसानदायी ठरू शकते. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल. मेहनतीला न घाबरणारे विद्यार्थी वेळेचा लाभ घेऊ शकतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.

वृश्चिक: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रेमिकेशी जवळीक वाढल्याने नाते दृढ होईल. आर्थिक चिंता सतावण्याची संभावना आहे. खर्चात वाढ होईल व त्या मानाने प्राप्ती कमी होईल. व्यापाऱ्यांना कामात यश प्राप्ती होईल. प्रयत्न केल्यास नवीन काही सौदे हाती लागू शकतात. नोकरदारांसाठी आठवडा अनुकूल असला तरी कोणीतरी एखादा आळ घेण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहावे. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. विषयांवर चांगली पकड मिळविण्यात यशस्वी होतील. स्पर्धेतयशस्वी होण्याची संधी मिळू शकते.

धनु: हा आठवडा चांगला आहे. काही गुप्त योजनांची अंमलबजावणी कराल. यश प्राप्त होईल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहिल्याने दांपत्य जीवन सुखद होईल. कोणत्याही प्रकारचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे मन आपल्या कामापासून विचलित होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्यच राहील. जास्त मेहनत केल्यास लाभ होईल. बँकेतील शिल्लक वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल असला तरी त्यांनी मेहनत केल्यास यश प्राप्त होऊ शकते.

मकर: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. कौटुंबिक वातावरण काहीसे उलथापालथीने भरलेले असेल. वडिलांशी संबंधावर प्रभाव पडेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल असल्याने कोणताही मोठा निर्णय घेण्याचे टाळावे. मेहनतीचे फळ मिळेल. व्यापारात तेजी आल्याने आनंदित व्हाल. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात मेहनत वाढवावी लागेल.

कुंभ: हा आठवडा चांगला आहे. मित्रांसह मौजमजा करण्याची संधी मिळेल. घरात एखादे शुभ कार्य होईल किंवा एखाद्याचा विवाह ठरू शकतो. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जमीन - जुमल्याशी संबंधित गोष्टींकडे आपले लक्ष वेधले जाईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. मेहनतीने प्रगती करू शकाल. हा आठवडा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आहे. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा मिश्र फलदायी आहे.

मीन: हा आठवडा चांगला आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा मनसोक्त उपभोग घेऊ शकतील. प्रेमीजनांसाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. मित्रांची भेट होईल. आपण त्यांच्याशी आपल्या कामाशी संबंधित बाबींची चर्चा कराल व ते आपणास पाठिंबा देतील. मन उत्साहित राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला असला तरी कोणाशी विनाकारण वाद घालत बसू नका. व्यापारासाठी आठवडा उन्नतीदायक आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावेल.