Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य:'या' राशींच्या व्यक्तींच्या विवाहास अनुकूल काळ; व्यवसायात भरभराट होईल, आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 11:44 AM2024-12-01T11:44:34+5:302024-12-01T11:53:10+5:30

Weekly Horoscope: ०१ डिसेंबर २०२४ ते ०७ डिसेंबर २०२४ हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात २ डिसेंबर रोजी शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. अन्य कुठलेही ग्रहपालट नाहीत. ग्रहस्थिती अशी- गुरू आणि हर्षल वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतू कन्या राशीत, रवि आणि बुध वृश्चिक राशीत आहेत. शुक्र धनू राशीत असून, दि. २ डिसेंबर रोजी तो मकर राशीत जाईल. प्लूटो मकर राशीत आहे.

शनि कुंभ राशीत आहे. राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण वृश्चिक, धनू, मकर आणि कुंभ राशीतून राहील. दि. २ डिसेंबरपासून मार्गशीर्ष मास सुरू होत आहे. खंडोबाचे नवरात्र सुरू होत आहे. दि. ४ रोजी विनायकी चतुर्थी आहे. दि. ६ रोजी नागदिवे पूजन आहे. दि. ७ रोजी चंपाषष्ठी, स्कंदषष्ठी आहे.

दि. ७ रोजी सकाळी ५:०८ पासून पंचक सुरू होत आहे. रविवार, दि. १ डिसेंबर २०२४ रोजी कार्तिक कृष्ण अमावास्या (सकाळी ११:५१ पर्यंत) आहे. दुपारी २:२४ पर्यंत अनुराधा तर त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र राहील. रास वृश्चिक आहे. दिवस सामान्य आहे. राहू काळ सायंकाळी ४:३० ते ६ या वेळेत राहील.

मेष- इच्छा पूर्ण होतील : या सप्ताहात तुमच्या अनेक इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. नोकरीत अचानक मोठी संधी मिळू शकते. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. घरी पाहुणे मंडळी येतील. थोडा सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. काही चांगले अनुभव येतील. मात्र, सप्ताहाच्या सुरुवातीला रविवार, सोमवार बेपर्वाईने वागू नका. अष्टम स्थानातून होणाऱ्या चंद्र, रवी, बुध युतीची संमिश्र फळे मिळतील. मंगळवार, बुधवार भाग्य स्थानातील चंद्रामुळे अनुकूल फळे मिळतील. अनेक अडचणी दूर होतील. टीप : मंगळवार, क्रवार चांगले दिवस.

वृषभ- ग्रहमानाचा अनुभव येईल. अष्टम स्थानातून होणाऱ्या चंद्र भ्रमणामुळे काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. मात्र, फार अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. इतरांच्या प्रश्नात गुंतून पडू नका. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या. घरगुती स्वरूपाचे वाद विकोपाला जाणार नाहीत, याची काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घेणे योग्य राहील. जीवनसाथीच्या कलाने घ्या. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. टीप : रविवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

मिथुन- साधकबाधक अनुभव येतील. संयमाने वागण्याची गरज आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. मित्रांच्या संगतीत वाहवत जाऊ नका. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. तुमच्या योजना लोकांना सांगत बसू नका. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. त्यादृष्टीने मंगळवार, बुधवार हे दिवस महत्त्वपूर्ण ठरतील. भेटवस्तू प्राप्त होतील. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करा. टीप : मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.

कर्क- होतील : आर्थिक आर्थिक लाभ लाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मात्र, आपण सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढा. सुरुवातीला तुमच्या मनात काही शंका असतील. ज्येष्ठांचा सल्ला घ्या. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचून काढा. प्रवास शक्यतो टाळा. तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या आणि तुम्हाला खर्चात पाडणाऱ्या लोकांपासून कटाक्षाने दूर राहा. चांगल्या सवयींचा अंगीकार करणे आवश्यक आहे. कुणाचा अपमान होईल असे बोलू नका. टीप : रविवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

सिंह - पुरस्कार मिळतील : ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. सुरुवातीला चतुर्थ स्थानातील रवी, बुध, चंद्र युतीमुळे घरात कुरबुरी होऊ शकतात. आपण थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात सतत व्यस्त राहाल. काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल. पुरस्कार जाहीर होतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. मान वाढेल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. परीक्षांचे निकाल मनासारखे लागतील. टीप : मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.

कन्या - नवीन संधी मिळेल : या सप्ताहात तुमचे एखादे स्वप्न साकार होऊ शकते. थोड्या प्रयत्नातच जास्त यश मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील. सुरुवातीला व्यवसायात थोडी धावपळ करावी लागेल. कामानिमित्त फिरावे लागेल. रविवार, सोमवार हे दोन दिवस मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. भावंडांशी गैरसमज होतील. घरात मंगल कार्याचे आयोजन केले जाईल. नोकरीत नवीन संधी मिळेल. बढती, पगारवाढ मिळेल. त्या दृष्टीने मंगळवार, बुधवार चांगले दिवस आहेत. टीप : मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

तूळ- राहील : ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. सुरुवातीला काही अडचणी येतील. मात्र. मंगळवारपासून परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. व्यवसायात भरभराट होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळच्या सहलीला जाऊन याल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. कामात बदल होऊ शकतात. सहकारी वर्गाला सांभाळून घ्या. जमिनीच्या व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्या. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. टीप : मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

वृश्चिक - सफलता : जे जे ठरवाल ते ते सिद्धीस जाईल, अशी परिस्थिती राहील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. धनस्थानातून होणाऱ्या चंद्र भ्रमणामुळे मंगळवार, बुधवारी लाभ होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. भेटवस्तू प्राप्त होतील. एखादे महत्त्वाचे काम हातावेगळे कराल. सुरुवातीला मनात काळजीचे विचार राहतील. थोडा सकारात्मक विचार केला पाहिजे. जवळचा प्रवास होईल. घरात मंगल कार्य ठरेल. शेवटच्या टप्प्यात नोकरीत कामाचा ताण राहील. टीप : सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

धनू- लाभ होतील : लाभदायक परिस्थिती राहील. मात्र सुरुवातीचे दोन दिवस काही अडचणी असतील. संयमाने वागण्याची गरज आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मंगळवार, बुधवारी प्रथम स्थानातील चंद्रामुळे तसेच धनस्थानातील शुक्रामुळे शुभ फळे मिळतील. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास हरकत नाही. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. टीप : मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

मकर- परिस्थिती : ग्रहमानाची साथ राहील. मात्र, वेळेचे नियोजन नीट केले पाहिजे. लोक तुम्हाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतील. मात्र, त्यांचा हेतू लक्षात घ्या. काही लोक तुम्हाला चुकीचा सल्ला देतील. पैशाचा ओघ सुरू राहील. मात्र, चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या मित्रांपासून दूर राहा. जीवनसाथीची साथ राहील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. टीप : रविवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

कुंभ- धनलक्ष्मीची कृपा राहील : अकल्पित मीन- बढती मिळू शकते : विविध क्षेत्रांत तुमच्या हातून उल्लेखनीय लाभ होऊ शकतात. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या समोर काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी असतील; पण त्यावर आपण संयमाने वागून मात कराल. घरी पाहुणे मंडळी येतील. वादाचे प्रसंग खुबीने टाळा. मंगळवार, बुधवारी लाभ स्थानातील चंद्र तुम्हाला शुभ फळे देईल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. महत्त्वाची कामे या काळात हातावेगळी करा. इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. जीवनसाथीचे मन मोडू नका. टीप : मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.

मीन- बढती मिळू शकते : विविध क्षेत्रांत तुमच्या हातून उल्लेखनीय लाभ होऊ शकतात. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या समोर काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी असतील; पण त्यावर आपण संयमाने वागून मात कराल. घरी पाहुणे मंडळी येतील. वादाचे प्रसंग खुबीने टाळा. मंगळवार, बुधवारी लाभ स्थानातील चंद्र तुम्हाला शुभ फळे देईल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. महत्त्वाची कामे या काळात हातावेगळी करा. इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. जीवनसाथीचे मन मोडू नका. टीप : मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस. कामगिरी होईल. मुलांच्या यशाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. सुरुवातीला तुमच्या कामात लोक चुका काढण्याचा प्रयत्न करतील. मात्र आपण त्यांना पुरून उराल. नोकरीत तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. तुमच्या योग्यतेची दखल घेतली जाईल. पगारवाढ, बढती, तत्सम लाभ अशी फळे मिळतील. वास्तू खरेदीचे मनसुबे सिद्धीस जातील. टीप : मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस. - विजय देशपांडे (ज्योतिषविशारद]