साप्ताहिक राशीभविष्य - 19 मार्च 2023 ते 25 मार्च 2023: साप्ताहिक राशीभविष्य : ‘या’ 4 राशीच्या लोकांसाठी चांगला आठवडा, धनलक्ष्मी प्रसन्न राहील By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 11:20 AM 2023-03-19T11:20:33+5:30 2023-03-19T11:45:54+5:30
रविवारी प्रदोष, मंगळवारी अमावास्या, बुधवारी गुढीपाडवा आहे. रविवारी सकाळी ११.१७ पासून पंचक सुरु होत आहे. सोमवार, मंगळवार, बुधवारी पूर्ण दिवस पंचक राहील. गुरुवारी दुपारी २.०४ पर्यंत पंचक राहील. फाल्गुन महिन्याची अखेर आणि चैत्राचा प्रारंभ. नववर्षाची सुरुवात होणाऱ्या या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- शुक्र, राहू आणि हर्षल मेषेत मंगळ मिथुनेत, केतू तुळेत आहेत. प्लुटो मकरेत, शनी कुंभेत आहे. रवी, बुध, गुरु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण मकर, कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशीतून राहील.
रविवारी प्रदोष, मंगळवारी अमावास्या, बुधवारी गुढीपाडवा आहे. रविवारी सकाळी ११.१७ पासून पंचक सुरु होत आहे. सोमवार, मंगळवार, बुधवारी पूर्ण दिवस पंचक राहील. गुरुवारी दुपारी २.०४ पर्यंत पंचक राहील.
रविवार, दि. १९ मार्च २०२३ रोजी सकाळी ८.०८ पर्यंत फाल्गुन कृष्ण द्वादशी, तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री पहाटे ४.५६ पर्यंत त्रयोदशी राहील. नक्षत्र रात्री १०.०४ पर्यंत घनिष्ठा तर त्यानंतर शततारका राहील. सकाळी ११.१७ पर्यंत मकर तर त्यानंतर कुंभ रास राहील. आज सामान्य दिवस आहे. प्रदोष आहे. राहू काळ सायंकाळी ४.३० ते ६.
मेष - चांगल्या संधी मिळतील या सप्ताहात आपण सतत लोकांच्या संपर्कात राहाल. नवीन ओळखी होतील. नवीन माहिती कळेल. चांगल्या संधी चालून येतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मात्र कुणी तुमच्या खासगी जीवनात जास्त डोकावण्याचा प्रयत्न करेल, तर सावध राहा. काहींना प्रवास घडून येतील. काही चांगल्या बातम्या कानावर पडतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. तरुण वर्गाला प्रेमात प्रतिसाद मिळेल. मात्र कुणी तुम्हाला मोहात अडकवण्याचा प्रयत्न करेल. टीप - रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
वृषभ- आवक चांगली राहील या सप्ताहात काहींना जवळपासच्या प्रवासाचा योग येईल. मुलांच्या प्रगतीच्या वार्ता कानी पडतील. नोकरीत काही बदल होईल. थोडी दगदग होईल. घरी पाहुणे मंडळी येतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. विविध प्रकारच्या भेटवस्तू मिळतील. तुमच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. मात्र एखाद्या व्यवहारात फार वाहवत गेलात तर नुकसान होऊ शकते. त्यामुळे थोडे संयमाने व्यवहार करणे आवश्यक आहे. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. टीप- रविवार, बुधवार, गुरुवार, शनिवार चांगले दिवस.
मिथुन- कामाचा ताण वाढेल : या सप्ताहात संमिश्र ग्रहमान अनुभवायला मिळेल. सप्ताहाची सुरुवात चाचपडत होईल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. त्यात तुमचा कस लागेल. तुमच्या हातून नकळत काही चुका होतील. त्याकडे बोट दाखवले जाईल. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. काहींना चांगल्या संधी मिळतील. त्यात फायदा होईल. आर्थिक आवक चांगली राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता ऐकून समाधान वाटेल. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
कर्क- अनुकूलता राहील : हा सप्ताह अनुकूल राहील. सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडतील. प्रवासात दगदग होईल; पण त्यानंतर तुमच्या प्रगतीचा रथ वेगाने धावू लागेल. सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. ती तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. कागदपत्रे वाचून घेतलेली बरी. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. नवीन संधी मिळतील. नवीन लोकांच्या ओळखी होतील. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार चांगले दिवस.
सिंह- प्रलंबित कामे पूर्ण होतील या सप्ताहात आरोग्यात सुधारणा होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. त्यामुळे स्वतःकडे व घराकडे लक्ष देण्यास वेळ मिळेल. जीवनसाथी तुमची चांगली काळजी घेईल. आर्थिक व्यवहार जपून करा. तुमचे बाजारपेठेचे अंदाज चुकू शकतात. अचानक फायदा होऊ शकतो किवा नुकसान पण होऊ शकते. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. तरुण वर्गाला प्रेमात अनुकूल प्रतिसाद मिळेल. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत अनुकूल बदल होतील. त्यात फायदा होईल. टीप- सोमवार, शुक्रवार, शनिवारी, रविवार चांगले दिवस.
कन्या- आत्मविश्वास राहील : संमिश्र ग्रहमानाचा अनुभव घ्याल. आरोग्याची काळजी घ्या. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. तुमच्या मनात आत्मविश्वास राहील. त्या जोरावर आपण आपली वाटचाल सुरु ठेवाल. नोकरीत आपली कामे सोप्या पद्धतीने पूर्ण करण्यावर भर द्या. कार्यालयीन राजकारणाकडे लक्ष देऊ नका. नाही तर विनाकारण तुमचे विरोधक वाढतील. जीवनसाथीचा सल्ला घ्यावा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. काहींना अचानक धनलाभ होईल. टीप- रविवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.
तूळ - प्रेमात - सफलता मिळेल : धनलाभ होण्याच्या दृष्टीने या सप्ताहात शुभ फळे मिळतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. मात्र काही कारणाने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. आहाराकडे लक्ष द्या. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. आराम करणे चांगले. अनोळखी व्यक्तींच्या जास्त संपर्कात राहू नका. इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. सहकारी वर्गाशी कामापुरते काम ठेवा. टीप- रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
वृश्चिक- नावलौकिक वाढेल : मुलांची अभ्यासात प्रगती होईल. मात्र त्यांच्यावर जास्त ताण पडणार नाही, याची काळजी घ्या. तसेच मुलांशी संवाद साधा. त्यांच्या अडचणी समजून घ्या. सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. काही छुप्या विरोधकांच्या कारवाया चालू राहतील. त्यामुळे मनस्ताप सहन करावा. लागेल. आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथीशी गैरसमज होतील. आजोळच्या लोकांशी बाद होऊ शकतात. टीप- रविवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.
धनु- घरासाठी वेळ द्या : या सप्ताहात कौटुंबिक पातळीवर आपली भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भावंडांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. घरी अचानक पाहुणे येतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. मात्र त्या नादात मुलांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधा. त्यांच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज घ्या. सामाजिक कार्यात तुमच्यावर दबाव आणला जाईल. थोडे संयमाने व मुत्सद्दीपणाने वागणे आवश्यक आहे. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. टीप- रविवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.
मकर- योग्य संधी मिळेल : नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामात अडचणी येतील. कागदपत्रे नीट वाचून मगच सही करा. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण सामान्य राहील. वसुलीच्या कामात हेलपाटे मारावे लागतील. मुलांना यश मिळेल. त्यांचे सर्वत्र कौतुक होईल, स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगल्या बातम्या कळतील. घरी अचानक पाहुणे मंडळी येतील. खाण्या पिण्याची चंगळ राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राखण्याचा प्रयत्न करा. टीप- रविवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.
कुंभ- भेटवस्तू मिळतील : आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. काहींना भेटवस्तू मिळतील. आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. नोकरीत सतत कार्यरत राहावे लागेल. कामाचे स्वरूप बदलेल. वारसाहक्काने मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ होईल. भावंडांशी वाद टाळा. अचानक प्रवासाचा बेत ठरेल. प्रवासात सतर्क राहा. व्यवसायात अंदाज चुकू शकतात. त्यामुळे मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. टीप- रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.
मीन- आर्थिक प्राप्ती होईल : शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला काळ आहे. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र त्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतील. नातेवाइकांच्या मदतीला धावून जावे लागेल. प्रसंगी पदरमोड करावी लागेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात तुमच्या अडचणी दूर होतील, मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. काही चांगल्या घटना घडतील. त्यामुळे आनंद होईल. मनात सकारात्मक विचार राहतील. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.