what is difference between rishi and muni and know about types and significance
ऋषी आणि मुनी यांच्यात फरक काय असतो? जाणून घ्या महत्त्व, मान्यता व प्रकार By देवेश फडके | Published: February 25, 2021 7:05 PM1 / 10मानवी जीवनाची मूल्ये, तत्त्वज्ञान, संस्कृतीचे दर्शक, परंपरा, चालिरिती आणि रुढी यांचा ऐतिहासिक ठेवा म्हणून वेद, पुराणे, उपनिषदे, धार्मिक ग्रंथ, भगवद्गीता, रामायण, महाभारत यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये सदर धार्मिक ग्रंथांतून अनेक कथा, कहाण्या या जीवनातील तत्त्वे समजून सांगण्यासाठी आलेल्या दिसतात. 2 / 10या सर्वांमध्ये एक महत्त्वाचा आणि समान धागा आढळून येतो, तो म्हणजे ऋषि आणि मुनी. भारतात आजही ऋषि आणि मुनी ज्ञानदानाचे कार्य करताना दिसतात. धर्मशास्त्राच्या आधारावर पाहायला गेल्यास ऋषि आणि मुनी या दोघांमध्ये फरक असल्याचे दिसून येते. 3 / 10ऋषि आणि मुनी यांच्यात फार फरक आहे, असे आपल्याला वाटत नाही. ऋषींचे अनेक प्रकारही असल्याचे सांगितले जाते. त्रिकालदर्शी अशी विद्यातपः संपन्न व्यक्ती म्हणजे ऋषी, असा अर्थ ऋषीचा सांगितला जातो. तर, धर्मशास्त्रातील उल्लेखांनुसार, मुनी म्हणजे सदैव स्वतःचा शोध घेणारी व्यक्ती. 4 / 10'ऋष्' धातूपासून 'ऋषि' हा शब्द झाला आहे. वेदमंत्रांचा द्रष्टा म्हणजे कर्ता असा याचा मूळ रूढार्थ होय. ऋषींऋण फेडण्यासाठी ऋषिपूजन करावे, असे सांगितले जाते. म्हणून ऋषिपंचमी व्रत केले जाते, अशी मान्यता आहे. 5 / 10आपला बहुतांश वेळा विचार करण्यात घालवत असतो तो मुनी. मुनी ही विचारवंत आणि तत्त्वज्ञाला प्रदान करण्यात आलेली एक उपाधी आहे, असे सांगितले जाते. वास्तविक ऋषि आणि मुनी या दोघांमध्ये बऱ्यापैकी समानता असते. मुनी हा ऋषि बनण्याचा एक टप्पा आहे. मुनी हा ऋषींचा एक प्रकार आहे, असेही काही ठिकाणी नमूद करण्यात आल्याचे सांगितले जाते.6 / 10मुनींकडे सामान्य गोष्टींकडे असामान्यपणे बघण्याचा दृष्टिकोन असतो. ऋषि एक तपस्वी असतो. मुनी हा सदैव आत्मचिंतन आणि साधनेत गुंग असतो. विश्वातील सूक्ष्म तत्वज्ञान व गूढाची उकल करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. 7 / 10तपश्चर्येच्या माध्यमातून ऋषींचे एकच लक्ष असते, ते म्हणजे आत्मनुभूती मिळवणे. ऋषी हे कवी असल्याचे म्हटले जाते. ऋषींचे मूलभूत सात प्रकार असल्याचे सांगितले जाते. 8 / 10तब्बल हजारो वर्षे राज्यकारभार करणारे राजे आपली संपत्ती व ऐश्वर्य याचा त्याग करून संन्यास स्वीकारून साधना व तपश्चर्येचा मार्ग स्विकारतात त्यावेळी त्यांना राजर्षी म्हणून ओळखले जातात.9 / 10देवर्षी हे त्रिकालदर्शी असतात. त्यांना भविष्याचे संपूर्ण ज्ञान असते. त्यांना त्रिलोकात विहार करण्याचे स्वातंत्र्य असते. नारद मुनी हे देवर्षी म्हणून ओळखले जातात. अत्यंत प्रतिभावान आणि ज्ञानी ऋषिला महर्षी म्हटले जाते. 10 / 10ब्रह्मर्षी या सर्वोच्च स्थानाच्या प्राप्तीच्या अगदी काही पावले अंतरावर असलेल्या लोकांना ही उपाधी मिळते. ब्रम्हर्षी हे आत्मज्ञानी असतात. वशिष्ठ व विश्वामित्र या रामायणकालीन ऋषींना ब्रह्मर्षी उपाधी प्राप्ती झाली होती. याशिवाय परमर्षी, कांडर्षी आणि श्रुतर्षी असे तीन प्रकार ऋषिंचे सांगितले जातात. यासह सप्तर्षी, प्रजापती ऋषि, गोत्रर्षी, वैदिक ऋषि, असे प्रकारही आढळून येतात. आणखी वाचा Subscribe to Notifications