विजय दीनानाथ चौहान... अमिताभ बच्चन २२ सिनेमांमध्ये बनले 'विजय'; कारण माहित्येय का? By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 5:03 PM1 / 10बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला 52 वर्षे पूर्ण झाली. तेव्हा जाणून घेऊ या त्यांच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी...2 / 10 सन 1969 मध्ये प्रदर्शित झालेला ‘सात हिंदुस्तानी’ हा अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट होता. पण हा पहिलाच सिनेमा सुपरफ्लॉप ठरला होता.3 / 10यानंतरही यश त्यांना हुलकावणी देत राहिले. त्यांचे एकामागोमाग एक असे 12 चित्रपट फ्लॉप झाले. परंतु,1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’ या चित्रपटाने अमिताभ यांना नवी ओळख दिली. 4 / 10‘जंजीर’ हा सिनेमा अनेक सुपरस्टार्सनी रिजेक्ट केल्यानंतर अमिताभ यांना मिळाला होता. दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘जंजीर’च्या शूटींगदरम्यान अमिताभ खूप नर्व्हस राहायचे. शॉट दिल्यानंतर एकटेच कोका कोला प्यायचे. पण याच सिनेमाने अमिताभ यांना नवी ओळख दिली. 5 / 10‘जंजीर’ सिनेमात अमिताभ यांनी विजय नावाचे कॅरेक्टर जिवंत केले आणि पुढे 22 सिनेमांत विजय हेच त्यांच्या कॅरेक्टरचे नाव होते. अमिताभ यांच्या आयुष्यावर अनेक पुस्तके लिहिणाºया लेखिका भावना सौमाया यांनी यामागचे कारण सांगितले होते. 6 / 10भावना यांनी सांगितले होते की, ‘ज्या नावाने एखाद्या स्टारचा सिनेमा हिट होतो, पुढच्या सिनेमातही त्या स्टार्सच्या कॅरेक्टरला तेच नाव दिले जाते. ही बॉलिवूडची प्रथा आहे. एकदा मी जावेद अख्तर यांना याबद्दल विचारले होते. त्यावर, अमिताभ प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवत,म्हणून बहुतेक सिनेमात त्यांचे नाव विजय ठेवले गेले असावे, असे मला जावेद यांनी सांगितले होते.’7 / 101969 मध्ये मृणाल सेन यांच्या एका बंगाली सिनेमाला आवाज देत अमिताभ यांनी फिल्मी इंडस्ट्रीतील करिअरला सुरुवात केली होती. 8 / 10सर्वप्रथम अमिताभ यांना सुनील दत्त यांनी रेश्मा और शेरासाठी साईन केले होते. यासाठी इंदिरा गांधी यांनी त्यांची मैत्रिण नरगिस यांना पत्र लिहिले होते. हा सिनेमा 1971 साली रिलीज झाला होता.9 / 10अमिताभ यांनी आत्तापर्यंत 205 पेक्षा अधिक सिनेमे केले आहेत. 12 सिनेमांत त्यांनी डबल रोल आणि एका सिनेमात ट्रिपल रोल साकारला आहे.10 / 10अमिताभ बच्चन कदाचित सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेता असले तरी एक टप्पा असा आला जेव्हा त्याच्या खासगी कंपनीचे नुकसान झाले आणि त्यांना दिग्दर्शक यश चोप्रांची मदत घ्यावी लागली. त्यांची कहाणी ऐकून यश चोप्रा यांनी त्यांना ‘मोहब्बतें’ चित्रपटात भूमिका दिली. ज्यामुळे बिग बीची परिस्थिती थोडी सुधारली. आणखी वाचा Subscribe to Notifications