शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

४४९ रूपयांत दररोज ४ जीबी डेटा, ४९९ रूपयांची फ्री मेंबरशिप; पाहा काय मिळतंय Vi च्या जबरदस्त प्लॅनमध्ये

By जयदीप दाभोळकर | Published: August 08, 2021 12:31 PM

1 / 10
सध्या दूरसंचार कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांना टिकवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. Airtel, Reliance Jio, Vodafone-Idea सारख्या कंपन्या ग्राहकांना काही ना काही नव्या ऑफर्स देण्याचा प्रयत्न करत आहेत.
2 / 10
दरम्यान देशातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी व्होडाफोन आयडियानं आपल्या ग्राहकांसाठी एक नवी स्कीम आणली आहे. कंपनीनं आपल्या ४४९ रूपयांच्या प्लॅनमध्ये एक खास सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
3 / 10
४४९ रूपयांचं बेनिफिट कंपनी या प्लॅनमध्ये मोफत देणार आहे. ४४९ रूपयांचा प्लॅन पहिल्यापासूनच डबल बेनिफिट, विकेंड डेटा रोलओव्हर आणि मोफत नाईट डेटासारख्या सुविधांसह येतो. अशातच ग्राहकांसाठी हा प्लॅन अधिक व्हॅल्यू फॉर मनी बनला आहे.
4 / 10
व्होडाफोन आयडियाचा ४४९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन ५६ दिवसांच्या वैधतेसह येतो. यापूर्वी या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा देण्यात येत होता. परंतु आता कंपनी डबल डेटा ऑफर अंतर्गत यामध्ये दररोज ४ जीबी डेटा देत आहे.
5 / 10
या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज एकूण २२४ जीबी डेटा देण्यात येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस सारख्या सुविधाही देण्यात येत आहेत.
6 / 10
याशिवाय हा प्लॅन बिंज ऑल नाईट (Binge all-night) आणि विकेंड डेटा रोलओवर (Weekend data rollover) सुविधेसह येतो.
7 / 10
बिंज ऑल नाईट या सुविधेअंतर्गत ग्राहकांना रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अलिमिटेड डेटाचा वापर करता येतो.
8 / 10
विकेंड डेटा रोलओव्हर अंतर्गत ग्राहकांचा जो डेटा सोमवार ते शुक्रवार या कालावधीत वापरला जात नाही तो ग्राहकांना विकेंडला वापरता येतो.
9 / 10
कंपनीनं या प्लॅनसोबत आता नवी सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी या प्लॅनसोबत ग्राहकांना ZEE5 Premium चं एका वर्षाचं सबस्क्रिप्शन मोफत देत आहे.
10 / 10
या सबस्क्रिप्शनची किंमत ४९९ रूपये आहे. कंपनी ४४९ रुपयांच्या प्लॅनव्यतिरिक्त ६९९ आणि २९९ रूपयांच्या प्लॅनमध्येही वर्षभरासाठी ZEE5 Premium चा अॅक्सेस देत आहे. याप्रकारे आता ग्राहकांना ४४९ रूपयांचा प्लॅनही फायदेशीर ठरणार आहे.
टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडियाAirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओInternetइंटरनेट