मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देणार आनंदाची बातमी! पेन्शनधारकांच्या 18 महिन्यांच्या डीएबाबत निर्णय होणार By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 11:36 AM 2023-02-12T11:36:23+5:30 2023-02-12T11:41:52+5:30
कर्मचाऱ्यांसाठी आता मोदी सरकार आनंदाची बातमी देणार आहे, कोविड महामारीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना डीए मिळालेला नाही 18 महिन्यांपासून ही थकबाकी मिळालेली नाही. कर्मचाऱ्यांसाठी आता मोदी सरकार आनंदाची बातमी देणार आहे, कोविड महामारीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना डीए मिळालेला नाही 18 महिन्यांपासून ही थकबाकी मिळालेली नाही.
एका अहवालानुसार, या 18 महिन्यांच्या थकबाकी डीएबाबत सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते. अशा स्थितीत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खूशखबर मिळणार आहे.
मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यास 48 लाख कर्मचारी आणि 68 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत DA मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
या कर्मचाऱ्यांना या वर्षी होळीनंतर चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारी कर्मचारी आणि लाखो पेन्शनधारक या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोना महामारीच्या काळात 18 महिन्यांची डीए थकबाकी आहे.
आता होळीच्या मुहूर्तावर सरकार कर्मचाऱ्यांना ही भेट देऊ शकते, अशी अपेक्षा आहे. जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतचा महागाई भत्ता जाहीर करावा, अशी केंद्रीय कर्मचारी सातत्याने मागणी करत आहेत.
जेसीएम सचिवांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून या विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला होता. यावेळी डीएची मागणी केली होती. आता लवकरच निर्णय घेण्याची मागणी केली. मोदी सरकारने 7व्या वेतन आयोगाअंतर्गत थकबाकीदार डीएची मागणी मान्य केल्यास कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वाढ होऊ शकते.
लेव्हल-13 अधिकाऱ्यांना या महागाई भत्त्यामधून 1,23,100 ते 2,15,900 रुपये मिळू शकतात.
लेव्हल-14 साठी, DA थकबाकी रुपये 1,44,200 ते 2,18,200 रुपये असेल. असे झाल्यास होळीच्या दिवशी 48 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 68 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना फायदा होईल.
डीए थकबाकीचे पैसे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या बँडच्या आधारे दिले जातात.