शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Anil Ambani News: अनिल अंबानींच्या रिलायन्स समुहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ, मार्केट कॅप १००० टक्के वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 12:12 PM

1 / 12
मोठ्या कर्जात अडकलेल्या अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या रिलायन्स समुहाच्या (Reliance Group) मार्केट कॅपमध्ये १ हजार टक्क्यांपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ३ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ही मोठी वाढ झाली आहे.
2 / 12
मार्च महिन्यात अनिल अंबानी समुहाचं मार्केट कॅप ७३३ कोटी रूपये होतं. परंतु मे महिन्यात ते ३,८९० कोटी रूपयांवर गेलं आणि १८ जून रोजी ते ७,८६६ कोटी रूपयांवर पोहोचलं.
3 / 12
गेल्या २० दिवसांमध्ये समुहाच्या कंपन्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर (Reliance Infrastructure), रिलायन्स पॉवर (Reliance Power) आणि रिलायन्स कॅपिटलचं (Reliance Capital) मार्केट कॅप दुपटीपेक्षा अधिक झालं आहे.
4 / 12
रिलायन्स पॉवरचं मार्केट कॅप ४,४४६ कोटी रूपये, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचं मार्केट कॅप २,७६७ कोटी रूपये आणि रिलायन्स कॅपिटलचं मार्केट कॅप ६५३ कोटी रूपये आहे.
5 / 12
या तीन कंपन्यांमधून ५० लाखांपेक्षा अधिक किरकोळ गुंतवणूकदारांनाही फायदा झाा आहे. रिलायन्स समूहात मोठ्या प्रमाणात किरकोळ गुंतवणूकदार आहे.
6 / 12
रिलायन्स पॉवरमध्ये ३३ लाख, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ९ लाख आणि रिलायन्स कॅपिटलमध्ये ८ लाख किरकोळ गुंतवणूकदार आहेत.
7 / 12
गेल्या काही वर्षांदरम्यान एफआयआय आणि म्युच्युअल इंड रिलायन्स समुहाच्या कंपन्यांपासून दूर जाताना दिसत आहेत. तर दुसरीकडे बँकांनीदेखील तारण ठेवण्यात आलेल्या शेअर्सची बाजारात विक्री केली आहे.
8 / 12
याचीच खरेदी किरकोळ गुंतवणूकदारांनी केली आणि त्यानंतर कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत कंपनीच्या बाबतीत घडलेल्या सकारात्मक बाबींचाही कंपनीच्या शेअर्सवर परिणाम झाला आहे.
9 / 12
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने प्रमोटर ग्रुप आणि Varde Investment Partners, LLP ची सहयोगी कंपनी VSFI Holdings Pvt Ltd कडून ५५० कोटी रूपये जमवण्याची घोषणा केली आहे.
10 / 12
रिलायन्स पॉवरच्या बोर्डानं आपली प्रमोटर कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला एकूण १,३२५ कोटी रूपयांच्या ५९.५ कोटी प्रेफरन्शिअल शेअर आणि ७३ कोटी वॉरंट जारी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
11 / 12
यानंतर रिलायन्स पॉवरवर असलेल्या कर्जात १,३२५ कोटी रूपयांची घट होईल. तसंच रिलायन्स कॅपिटल समुहाची कंपनी रिलायन्स होम फायनॅन्स आपल्या विक्रीच्या अखेरच्या टप्प्यात आहे.
12 / 12
यामुळे रिलायन्स कॅपिटलवरील कर्जही ११ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक कमी होणार आहे.
टॅग्स :Relianceरिलायन्सAnil Ambaniअनिल अंबानीshare marketशेअर बाजारIndiaभारतbankबँक