atal pension yojana get rupees 10000 monthly you can invest in just rs 420
फक्त 420 रुपये जमा करा, दरमहा मिळतील 10 हजार रुपये; जाणून घ्या, काय आहे 'ही' खास योजना? By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 8:02 PM1 / 8नवी दिल्ली : जर तुम्हीही एखाद्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana APY) पैशांची गुंतवणूक करू शकता. 2 / 8दरम्यान, अटल पेन्शन योजना 2015 मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु या योजनेमध्ये 18 ते 40 वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शन घेऊ शकतो, ज्यांच्याजवळ बँक किंवा पोस्ट ऑफिसचे खाते आहे. 3 / 8या योजनेमध्ये ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते. तुम्ही अटल पेन्शन योजनेत केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून आहे. या योजनेंतर्गत किमान मासिक पेन्शन 1,000, 2000, 3000, 4000 आणि जास्तीत जास्त 5,000 रुपये मिळू शकते. 4 / 8जर तुम्हाला या पेन्शन योजनेसाठी नोंदणी करायची असेल तर तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. तुम्ही जितक्या लवकर अटल पेन्शन योजनेत सामील व्हाल, तितके अधिक फायदे तुम्हाला मिळतील. 5 / 8जर एखादी व्यक्ती 18 वर्षांच्या वयात अटल पेन्शन योजनेत सामील झाली, तर त्याला 60 वर्षांच्या वयानंतर प्रत्येक महिन्याला 5000 रुपये मासिक पेन्शनसाठी दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील.6 / 8 जर एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झाली तर वयाच्या 60 वर्षांनंतर त्याला दरमहा 5,000 रुपये मासिक पेन्शनसाठी फक्त 210 रुपये जमा करावे लागतील. त्याचबरोबर, 39 वर्षापेक्षा कमी वयाचे पती -पत्नी वेगवेगळे या योजनेत 420 रुपये जमा करून वयाच्या 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला स्वतंत्रपणे 10,000 रुपये पेन्शन घेऊ शकतात.7 / 8या योजनेत, दरमहा 1000 रुपये मासिक पेन्शनसाठी दरमहा फक्त 42 रुपये जमा करावे लागतील. दुसरीकडे, 2000 रुपयांच्या पेन्शनसाठी 84 रुपये, 3000 रुपयांसाठी 126 रुपये आणि 4000 रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी 168 रुपये दरमहा जमा करावे लागतील.8 / 8अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आयकर कायदा 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर लाभ मिळतो. यातून ग्राहकांचे करपात्र उत्पन्न वजा केले जाते. या व्यतिरिक्त, विशेष प्रकरणांमध्ये 50,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त कर लाभ उपलब्ध आहे. अशा प्रकारे, या योजनेमध्ये 2 लाख रुपयांपर्यंतची कपात मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications