शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC विमा धारकांसाठी खुशखबर! बंद पडलेली पॉलिसी देखील 'अॅक्टीव्ह' होणार, वाचा फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 6:01 PM

1 / 8
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून ओळख असलेल्या 'एलआयसी'नं मोठी घोषणा केली आहे. लॅप्स झालेल्या वैक्तिगत विमा पॉलिसी आता पुन्हा अॅक्टीव्ह करण्याचं अभियान कंपनीनं सुरू केलं आहे.
2 / 8
LIC नं शनिवारी एका प्रेस रिलीजमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. प्रिमिअम भरण्याचा कालावधी दरम्यान लॅप्स झालेल्या पॉलिसींचा मॅच्युरिटी पिरिएड (Maturity Period) पूर्ण झालेला नाही अशा पॉलिसी पुन्हा सुरू करता येऊ शकतात.
3 / 8
एलआयसीचं हे अभियान ७ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होणार आहे आणि पुढील महिन्यात २५ मार्च २०२२ पर्यंत चालवलं जाणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) हे देशातील सर्वात मोठं विमा महामंडळ आहे. याची सुरुवात १९५६ साली झाली होती.
4 / 8
कोरोना काळात विमा सुरक्षाच्या आवश्यकतेवर खूप भर देण्यात आला आहे आणि हे नवं अभियान एलआयसीच्या पॉलिसी धारकांसाठी नवसंजीवनी ठरणारं आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे. यात ग्राहकांना त्यांनी बंद केलेली पॉलिसी पुन्हा अॅक्टीव्ह करता येणार आहे.
5 / 8
जीवन कव्हरचा उपयोग करुन घेण्याचा आणि आपल्या कुटुंबीयांना एक आर्थिक सुरक्षा देण्याची सुवर्ण संधी ग्राहकांना मिळणार आहे. लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या दंडातही २० ते ३० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यातून ग्राहकांची जास्तीत जास्त ३ हजार रुपयांची बचत होणार आहे. तसंच मायक्रो इन्श्युरन्स प्लानवर कोणत्याही पद्धतीचा दंड आकारला जाणार नाहीय.
6 / 8
टर्म प्लान आणि उच्च जोखिम असणाऱ्या विमा पॉलिसींमध्ये अशापद्धतीची सूट देण्यात येणार नाही, असंही कंपनीनं म्हटलं आहे.
7 / 8
एलआयसीच्या नव्या योजनेनुसार जुनी पॉलिसी पुन्हा सक्रिय करण्यासाठी गरजेच्या असलेल्या वैद्यकीय रिपोर्टमध्ये कोणत्याही पद्धतीची सूट दिली जाणार नसल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.
8 / 8
ज्या विमा पॉलिसीचा गेल्या पाच वर्षांपासून प्रीमीअम भरण्यात आलेला नाही अशा पॉलिसी या अभियानाअंतर्गत पुन्हा अॅक्टीव्ह करता येणार आहे.
टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसीbusinessव्यवसाय