Bsnl Offeing Free Prbt With 99 Rupees Stv Know Details
BSNLच्या युजर्ससाठी खूशखबर, 'ही' सेवा 22 दिवसांसाठी असणार विनामूल्य! By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 02:05 PM2020-06-11T14:05:22+5:302020-06-11T15:03:32+5:30Join usJoin usNext नवी दिल्ली : बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी खूशखबर आहे. कंपनीने आपल्या 99 रुपयांच्या खास टॅरिफ व्हाउचरला रिवाईज केले आहे. आता या व्हाउचरमध्ये 22 दिवस विनामूल्य पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन (पीआरबीटी) सेवा दिली जात आहे. सामान्यता या सेवेसाठी बीएसएनएल कंपनी दरमहा 30 रुपये घेते आणि युजर्संसाठी प्रत्येक गाण्याच्या निवडीसाठी 12 रुपये द्यावे लागतात. सध्या 99 रुपयांच्या या प्लॅनमध्ये विनामूल्य पीआरबीटीसह इतरही फायदे उपलब्ध आहेत. बीएसएनएलचे हे खास टॅरिफ व्हाउचर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह येते. 22 दिवसांपर्यंत दररोज कॉल करण्यासाठी 250 एफयूपी मिनिटे मिळतात. मर्यादा संपल्यानंतर बेस टॅरिफ कॉल करण्यासाठी शुल्क आकारले जाते. बीएसएनएलचा हा प्लॅन आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, चंदीगड, चेन्नई, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, गुजरात, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, कर्नाटक, कोलकाता, लडाख, मध्य प्रदेश आणि देशातील इतर अनेक सर्कलच्या बीएसएनएलच्या ग्राहकांना या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. बीएसएनएलच्या 99 रुपयांच्या एसटीव्हीमध्ये मिळणाऱ्या या बेनिफिट्समध्ये काही सर्कल कमी केले आहेत. ईशान्येकडील काही राज्यांमध्ये या योजनेची वैधता 22 दिवसांवरून 21 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. दरम्याान, या युजर्सना पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन विनामूल्य देण्यात येत आहे. त्याचबरोबर, आसामच्या वापरकर्त्यांना या योजनेत विनामूल्य पीआरबीटीचा लाभ मिळत नाही. केरळ आणि लक्षद्वीपमध्ये ही एसटीव्ही 20 दिवसांच्या वैधतेसह येते. येथे कंपनी युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि विनामूल्य पीआरबीटी देत आहे.