शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

BSNLच्या युजर्ससाठी खूशखबर, 'ही' सेवा 22 दिवसांसाठी असणार विनामूल्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 2:05 PM

1 / 8
नवी दिल्ली : बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी खूशखबर आहे. कंपनीने आपल्या 99 रुपयांच्या खास टॅरिफ व्हाउचरला रिवाईज केले आहे. आता या व्हाउचरमध्ये 22 दिवस विनामूल्य पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन (पीआरबीटी) सेवा दिली जात आहे.
2 / 8
सामान्यता या सेवेसाठी बीएसएनएल कंपनी दरमहा 30 रुपये घेते आणि युजर्संसाठी प्रत्येक गाण्याच्या निवडीसाठी 12 रुपये द्यावे लागतात. सध्या 99 रुपयांच्या या प्लॅनमध्ये विनामूल्य पीआरबीटीसह इतरही फायदे उपलब्ध आहेत.
3 / 8
बीएसएनएलचे हे खास टॅरिफ व्हाउचर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह येते. 22 दिवसांपर्यंत दररोज कॉल करण्यासाठी 250 एफयूपी मिनिटे मिळतात. मर्यादा संपल्यानंतर बेस टॅरिफ कॉल करण्यासाठी शुल्क आकारले जाते.
4 / 8
बीएसएनएलचा हा प्लॅन आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, चंदीगड, चेन्नई, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, गुजरात, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये उपलब्ध आहे.
5 / 8
याशिवाय, कर्नाटक, कोलकाता, लडाख, मध्य प्रदेश आणि देशातील इतर अनेक सर्कलच्या बीएसएनएलच्या ग्राहकांना या ऑफरचा फायदा घेता येणार आहे.
6 / 8
बीएसएनएलच्या 99 रुपयांच्या एसटीव्हीमध्ये मिळणाऱ्या या बेनिफिट्समध्ये काही सर्कल कमी केले आहेत. ईशान्येकडील काही राज्यांमध्ये या योजनेची वैधता 22 दिवसांवरून 21 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
7 / 8
दरम्याान, या युजर्सना पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन विनामूल्य देण्यात येत आहे. त्याचबरोबर, आसामच्या वापरकर्त्यांना या योजनेत विनामूल्य पीआरबीटीचा लाभ मिळत नाही.
8 / 8
केरळ आणि लक्षद्वीपमध्ये ही एसटीव्ही 20 दिवसांच्या वैधतेसह येते. येथे कंपनी युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि विनामूल्य पीआरबीटी देत ​​आहे.