शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Business Idea: प्रॉफिटच प्रॉफिट! फक्त ५० हजारांत सुरु करा ५ लाखांचा बिझनेस; सरकारकडून मिळेल आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 1:09 PM

1 / 10
भारतात विविध क्षेत्रात अनेकविध प्रकारचे उद्योग, व्यवसाय केले जातात. देशातील तरुणांनी उद्योग, व्यवसायात उतरावे, यासाठी सरकारकडूनही प्रोत्साहन दिले जाते. काही व्यवसाय वा उद्योग सुरू करण्यासाठी अनुदानही देण्यात येते. देशातील अनेक जण नोकरी करता करताही व्यवसाय सुरू करत असतात. (Business Idea)
2 / 10
काही उद्योग वा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी गुंतवणूक लागते. मात्र, काही व्यवसाय हे कमी गुंतवणुकीत सुरू करता येऊ शकतात. तसेच यातून मोठा नफाही कमावता येऊ शकतो.
3 / 10
कोरोना काळापासून हेल्थ आणि मेडिकल क्षेत्राला मोठा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. तसेच आयुर्वेदाकडेही लोकांचा कल वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आयुर्वेदाशी संबंधित अशाच एका व्यवसायाबाबत जाणून घेऊया, ज्यातून कमी गुंतवणुकीत चांगला फायदा मिळवता येऊ शकेल, असे सांगितले जाते.
4 / 10
देशात आयुर्वेद आणि योगा आत्मसात करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. आयुर्वेद आपल्या प्राचीन संस्कृतीकडून मिळालेलं महत्वाचे ज्ञान आहे. कोणतेही दुष्परिणामांशिवाय आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा जगभरात सध्या चर्चा होत असते. त्यामुळे बदलत्या काळानुसार आयुर्वेदिक गोळ्या/कॅप्सूल इत्यादींच्या निर्मितीसाठी संशोधन आणि विकास वाढला आहे.
5 / 10
देशात आयुर्वेदिक उत्पादनांची मोठी बाजारपेठ आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात व्यवसायाची उत्तम संधी निर्माण झाली आहे.तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने मेडिकेटेड ऑइल मॅन्युफॅक्चरिंगचा पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही औषधी तेल बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.
6 / 10
युनिटची स्थापना करण्यासाठी सरकार पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत ९० टक्क्यांपर्यंत कर्ज आणि २५ टक्क्यांपर्यंत अनुदान देते. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने मेडिकेटेड ऑइल मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा अहवाल तयार केला आहे. त्या प्रकल्पासाठी ५०५००० रुपयांपर्यंत गुंतवणुकीचा खर्च आहे.
7 / 10
तुम्ही पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला फक्त ५०,५०० रुपये खर्च करावे लागतील आणि उर्वरित ९० टक्के रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून दिले जातील. प्रकल्पाच्या खर्चामध्ये १००० चौरस फूट इमारत शेड, मशिनरी-उपकरणे, खेळते भांडवल समाविष्ट आहे.
8 / 10
या खर्चात तुम्ही एका वर्षात औषधीयुक्त तेलाच्या सुमारे ९५,५०० बाटल्या तयार करू शकता. त्यासाठी एकूण खर्च १२,६१,००० असेल. सर्व खर्च साधारणत: १२.६१ लाख रुपये असेल. ९५,५०० बाटल्या विकून तुमची एकूण वार्षिक विक्री १५ लाख रुपयांची होईल.
9 / 10
तुम्ही सुमारे २.३९ लाख रुपये नफा कमवू शकता. म्हणजेच दरमहा सुमारे ३० हजार रुपये कमाई होऊ शकते. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज देण्यापूर्वी सरकार व्यवसायाशी संबंधित प्रशिक्षणही देते. यामध्ये व्यवसायातील बारकाव्यांबरोबरच व्यवस्थापन आणि विक्रीच्या पद्धतीही शिकवल्या जातात.
10 / 10
तुम्हाला मेडिकेटेड ऑइल युनिटसाठी कर्ज घ्यायचे असल्यास, तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता किंवा तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा उद्योग केंद्राशी किंवा खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
टॅग्स :businessव्यवसायIdeaआयडिया