शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

छप्परफाड कमाई; टाटाच्या 8 रुपयांच्या' या' शेअरनं ग्राहकांना केलं मालामाल, वर्षभरात 2157 टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 3:39 PM

1 / 8
टाटा समूहाची कंपनी TTML म्हणजेच Tata Teleservices (Maharashtra) Limited ने आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न्स दिले आहेत. गेल्या एका वर्षात यात 2157 टक्क्यांची वाढ झाली असून ते 7.95 रुपयांवरून 171.55 रुपयांवर पोहोचले आहेत.
2 / 8
गेल्या वर्षी 15 डिसेंबरला हा शेअर एनएसआयवर 7.95 रुपयांवर बंद झाला होता. मात्र, या शेअरवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने 5 टक्क्यांचे अपर सर्किट लागल्याचे दिसत आहे. सध्या यात नफा मिळत असल्याचे दिसत आहे.
3 / 8
TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी आहे. ही कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. ही कंपनी व्हॉईस, डेटा सेवा पुरवते. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत.
4 / 8
बाजारातील जाणकारांच्या मते, गेल्या महिन्यात या कंपनीने कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा सुरू केली आहे. या सेवेत कंपन्यांना फास्ट इंटरनेटसह क्लाउड बेस्ड सिक्योरिटी सर्व्हिसेस आणि ऑप्टोमाइज्ड कंट्रोलही मिळत आहे. यामुळे या सेवेला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
5 / 8
क्लाउड आधारित सुरक्षा हे या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, यामुळे डेटा सुरक्षित ठेवला जाऊ शकेल. जे बिझनेस डिजिटल तत्त्वावर चालत आहेत, त्यांना या लीज लाइनचा अत्यंत फायदा होईल.
6 / 8
यात सर्व प्रकारच्या सायबर फ्रॉडपासून सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात आली आहे. याच बरोबर फास्ट इंटरनेटची सुविधाही देण्यात आली आहे.
7 / 8
टाटा समूहाच्या कंपन्यांचा TTML मध्ये सप्टेंबर 2021 पर्यंत 74.36 टक्के हिस्सा होता. यांत 74.36 टक्के शेअर टाटा टेलिसर्व्हिसेसचा नोंदवला गेला.
8 / 8
यानंतर टाटा संसचे 19.58 टक्के आणि टाटा पावर कंपनीचे 6.48 टक्के शेअर्स नोंदवले गेले. याशिवाय वैयक्तिकरित्या, TTML मध्ये 23.22 टक्के शेअर्स ठेवण्यात आले.
टॅग्स :TataटाटाStock Marketशेअर बाजारshare marketशेअर बाजारMarketबाजार