३१ ऑक्टोबरपूर्वी आटोपून घ्या ITR फाईलसह ही ४ महत्त्वाची कामे, अन्यथा होईल मोठे नुकसान By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 03:34 PM 2021-10-20T15:34:51+5:30 2021-10-20T15:42:37+5:30
Money News: ऑक्टोबर महिना संपण्यासाठी आता केवळ १० दिवसांचा काळ उरला आहे त्या पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेऊया ३१ ऑक्टोबरपूर्वी आटोपून घेण्याची आवश्यकता असलेल्या चार महत्त्वाच्या कामांविषयी. ऑक्टोबर महिना संपण्यासाठी आता केवळ १० दिवसांचा काळ उरला आहे. अशा परिस्थितीत ३१ ऑक्टोबरपर्यंत अनेक महत्त्वाची कामे आटोपून घेण्यासाठी तुमच्याकडे मोजकेच दिवस उरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेऊया ३१ ऑक्टोबरपूर्वी आटोपून घेण्याची आवश्यकता असलेल्या चार महत्त्वाच्या कामांविषयी.
एचडीएफसी बँकेची खास ऑफर जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर हाऊसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसी बँकेची खास ऑफर ३१ ऑक्टोबर रोजी समाप्त होत आहे. एचडीएफसीने फेस्टिव्ह सिझन निमित्त होमलोनच्या दरामध्ये कपात केली होती. त्याअंतर्गत ग्राहक ६.७० टक्के वार्षिक व्याजदराने होम लोन घेऊ शकतात. ही विशेष ऑफर ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे.
पीएम किसान योजनेसाठी नोंदणी पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडे नोंदणी करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत आहे. जर यादरम्यान, आपली नोंदणी करून घेतली तर त्यांना दोन हप्त्यांमध्ये चार हजार रुपयांचा लाभ होणार आहे.
एसबीआयचे ग्राहक फ्रीमध्ये भरू शकतात ITR स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक इन्कम टॅक्स रिटर्न आता फ्रीमध्ये दाखल करू शकतात. एसबीआयचे ग्राहक YONO अॅपवर Tax2Win च्या माध्यमातून ITR भरू शकता. एसबीआयने सोशल मीडियाच्या माध्यमातू सांगितले की, YONO वर Tax2Win च्या माध्यमातून असे करू शकता. ही ऑफर ३१ ऑक्टोबरपर्यंत मर्यादित आहे.
गाडीची नोंदणी आणि डीएल रिन्यू करा तुमच्या गाडीची नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि फिटनेस सर्टिफिकेटसारखी कागदपत्रे रिन्यू करण्यासाठीची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही ही कागदपत्रे रिन्यू करायची असतील तर लवकरात लवकर करून घ्या. असे न केल्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.