शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डिफेन्स कंपनीला मिळाली ₹678 कोटींची ऑर्डर अन् शेअरनं केला नवा विक्रम; ₹200 वर पोहोचू शकतो भाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 7:56 PM

1 / 9
डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरने नवा विक्रम केला आहे. या सरकारी कंपनीचा शेअर आपल्या ऑल टाइम हायवर पोहोचला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सचा (BEL) शेअर मंगळवारी 5 पर्सेंटपेक्षाही अधिक तेजीसह 184.50 रुपयांवर पोहोचला आहे.
2 / 9
कंपनीच्या शेअरचा हा 52 आठावड्यांतील उच्चांक देखील आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरमध्ये ही तेजी 678 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्याने आली आहे. कंपनीचा शअर शुक्रवारी 174.85 रुपयांवर बंद झाला होता.
3 / 9
यूपी सरकारकडून मिळाली ₹445 कोटींची ऑर्डर - भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला एक ऑर्डर उत्तर प्रदेश सरकारकडून मिळाली आहे. ही ऑर्डर 445 कोटी रुपयांची असून नेक्स्ट जनरेशन इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम- UP DIAL 112 प्रोजेक्टसाठी मिळाली आहे.
4 / 9
या प्रोजेक्ट अंतर्गत कंपनी हार्डवेअर, AI बेस्ड सॉफ्टवेअर टूल्स आणि सायबर सिक्योरिटी सॉल्यूशन्स उपलब्ध करून देईल. हा प्रोजेक्ट संपूर्ण राज्यासाठी आहे. कंपनीने ही माहिती एक्सचेन्ज फायलिंगमध्ये दिली आहे.
5 / 9
दुसरी ऑर्डर 233 कोटी रुपयांची - भारत इलेक्ट्रॉनिक्सला मिळालेली दुसरी ऑर्डर आहे 233 कोटी रुपयांची. ही ऑर्डर कम्युनिकेशन डिस्प्ले युनिट्स, थर्मल इमॅजिंग कॅमेरा आणि इतरही काही स्पेअर्स आणि सर्व्हिसेससाठी आहे. या ऑर्डर्स बरोबरच चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत कंपनीला एकूण 26,613 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.
6 / 9
ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने (CLSA) भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्सवर बाय रेटिंग कायम ठेवली आहे. ब्रोकरेज हाऊसने या कंपनीच्या शेअरसाठी 207 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. यापूर्वी, ब्रोकरेज हाऊसने भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्ससाठी 157 रुपयांचे टार्गेट दिले होते.
7 / 9
गेल्या एका वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्सने 85 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला होता. तर, गेल्या 6 महिन्यांत या शेअरने 53 टक्क्यांची उसळी घेतली आहे.
8 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसाDefenceसंरक्षण विभाग