शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' चार गोष्टी खरेदी केल्यास मिळतोय मोफत विमा, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 3:19 PM

1 / 7
तुम्ही बाजारातून बऱ्याच गोष्टी खरेदी करत असाल, पण तुम्हाला माहीत आहे काय, कोण-कोणत्या गोष्टींवर विनामूल्य विमा मिळतो? अनेकांना हे माहीत नसेल. दरम्यान, आजच्या काळात विमा खूप महत्वाचा झाला आहे, मग तो आरोग्य विमा असो, जीवन विमा असो किंवा इतर कोणताही विमा.
2 / 7
विमाद्वारे तुम्हाला अनेक प्रकारची मदत मिळते. दुर्दैवाने, जर तुम्ही आजारी पडलात आणि रुग्णालयात दाखल असाल तर खर्च कोण उचलणार? जर तुम्ही आरोग्य विमा घेतला असेल, तर त्याचा संपूर्ण खर्च विमा कंपनी करेल, तुमच्यावर हॉस्पिटलच्या खर्चाचा बोजा पडणार नाही.
3 / 7
आता मोफत विम्याबद्दल बोलूया. विनामूल्य नाव ऐकल्यावर, बरेच लोक अधीर होतात आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात की जे विनामूल्य उपलब्ध आहे, ते कसे उपलब्ध आहे? चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता आणि मोफत विम्याचा लाभ घेऊ शकता?
4 / 7
एलपीजी गॅस कनेक्शनसह, ग्राहकांना केवळ वैयक्तिक अपघाताचे संरक्षण मिळते. तसेच, गॅस सिलेंडर खरेदी केल्यावर 50 लाख रुपयांपर्यंतचा विमा देखील मिळतो. गॅस गळती किंवा सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे अपघात झाल्यास, या विम्याचा लाभ आर्थिक मदतीच्या स्वरूपात उपलब्ध आहे.
5 / 7
मोबाईल रिचार्जवर सुद्धा मोफत विमा उपलब्ध आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, ना? दरम्यान, एअरटेल कंपनी आपल्या दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅनसोबत (279 आणि 179 रुपये) विनामूल्य मुदत जीवन विमा देते.
6 / 7
जर तुमच्याकडे EPFO ​​खाते असेल, तर तुम्हाला माहीत असले पाहिजे ,की त्यावर 7 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. नैसर्गिक कारणांमुळे, आजारपणाने किंवा अपघातामुळे मृत्यू झाल्यास, नामांकित व्यक्तीला EPFO ​​कडून 7 लाख रुपयांपर्यंत एकरकमी पेमेंट मिळते.
7 / 7
अनेक बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर मोफत विमा संरक्षण देखील उपलब्ध आहे, ज्यात अपघात संरक्षण, खरेदी संरक्षण कवच आणि कायमचे अपंगत्व संरक्षण इत्यादींचा समावेश आहे. आजकाल अनेकांकडे डेबिट आणि क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना या विमा संरक्षणाबाबत माहिती असावी.
टॅग्स :businessव्यवसाय