Do you want to withdraw money from your EPF account See what the whole process
तुम्हाला तुमच्या EPF खात्यातून रक्कम काढायची आहे?; पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 12:13 PM1 / 10 जर तुम्हाला PF खात्यातू अंशत: किंवा पूर्ण रक्कम काढायची असेल तर तुम्हाला तुमचा UAN क्रमांक आवश्यक असतो. परंतु तुमच्याकडे युएएन क्रमांक नसला तरी तुमच्या खात्यातून पैसे काढणं शक्य आहे. 2 / 10अशा प्रकारे तुमच्या पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो आणि नंतर तो तुम्हाला EPFO कार्यालयात जमा करावा लागतो.3 / 10परंतु या प्रक्रियेमध्ये तुम्हाला EPFO कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू शकतात. परंतु तुम्हाला यापासून वाचायचं असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईनदेखील अर्ज करू शकता. 4 / 10ऑनलाईन प्रक्रियेद्वारे पैसे काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या संकेतस्थळावर जावं लागेल.5 / 10त्यानंतर तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा एन्टर करून लॉग इन करा. त्यानंतर Manage या ऑप्शनवर क्लिक करा. 6 / 10त्या ठिकाणी असलेल्या KYC ऑप्शनवरील सर्व माहिती तपासून पाहा आणि ऑनलाईन सर्व्हिसेसवर क्लिक करा. त्यानंतर एक ड्रॉप मेन्यू ओपन होईल.7 / 10यामध्ये Claim या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा क्लेम फॉर्म सबमिट करण्यासाठी Proceed For Online Claim वर क्लिक करा.8 / 10त्यानंतर ‘I Want To Apply For’ मध्ये जा. यामध्ये full EPF Settlement, EPF Part withdrawal (loan/advance) किंवा pension withdrawal ऑप्शनची निवड करा.9 / 10यात फॉर्म भरल्यानंतर ५ ते १० दिवसांमध्ये तुमच्या ईपीएफओशी रजिस्टर असलेल्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील. 10 / 10 यानंतर तुमच्या माहितीसाठी मोबाईलवर एक SMS पाठवला जाईल. जर तुमचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल तर तुम्ही ऑनलाईन पैसे काढण्यासाठी अर्ज करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications