शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC मध्ये करा फक्त ४ तास काम अन् दरमहा ७५ हजारापर्यंत कमवा; कसं जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 1:00 PM

1 / 12
सरकारने देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी LICनं तिजोरी उघडली आहे. जर आपण दहावी उत्तीर्ण असाल आणि आतापासून पार्ट टाइम काम सुरू करून आपली कमाई सुरू करायची असेल तर LIC साठी काम करुन पैसे कमविण्याची उत्तम संधी आहे.
2 / 12
LIC एजंट आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारच्या निश्चित वेळेची आवश्यकता नाही. आपण आपल्या क्लायंटला घरी बसून हे काम करू शकता. एलआयसीने शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्णवरुन इयत्ता १० वी उत्तीर्ण अशी कमी केली आहे. त्यामुळे आता अधिकाधिक तरुणांना LIC साठी काम करुन कमावण्याची संधी आहे.
3 / 12
LIC सोबत काम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे फुल टाइम किंवा पार्ट टाइम यापैकी तुम्ही तुमच्या प्राधान्यानुसार काम करू शकता. यामध्ये कमाईची कोणतीही मर्यादा नाही. एलआयसीच्या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जितके जास्त काम कराल तितके कमिशन तुम्हाला मिळेल, म्हणजेच या व्यवसायातील कमाई अमर्यादित आहे. एलआयसीच्या पॉलिसीवरील कमिशन पॉलिसीनुसार ठरवले जाते.
4 / 12
दिल्लीच्या गीता कंडारी अनेक वर्षांपासून LIC चं काम करत आहेत. दिवसातून त्या केवळ ४ ते ५ तास काम करून दर महिन्याला ७० ते ७५ हजार रुपये कमवत आहेत. LIC सोबत काम करून तुम्ही तुमचे अपेक्षित उत्पन्न निश्चित करू शकता. त्याच वेळी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्ही कामाचे तास स्वतः ठरवू शकता, असं कंडारी म्हणाल्या.
5 / 12
एलआयसीसाठी तुम्ही जितकी वर्ष काम करत जाता तितकी तुमची कमाई वाढतच जाते. काही काळानंतर, तुमच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा भाग जुनी पॉलिसी बनते. रिन्युअल पॉलिसींमुळे उत्पन्न चांगलं वाढतं.
6 / 12
कंपनीच्या वेबसाइटनुसार, जर एखाद्या ग्राहकाने २० वर्षांची पॉलिसी घेतली आणि दरवर्षी १०,००० रुपये प्रीमियम भरला, तर २० वर्षानंतर एजंटला एंडोमेंट पॉलिसीमध्ये १.३५ लाख रुपये आणि मनीबॅक पॉलिसीमध्ये १.४३ लाख रुपये मिळतात. आता ही फक्त एका ग्राहकाकडून मिळणारी कमाई झाली. एजंट जितक्या जास्त पॉलिसी ग्राहकांना विकतो तितकी त्याची कमाई त्यानुसार वाढते.
7 / 12
एलआयसी पॉलिसीच्या हप्त्यापैकी २५ टक्क्यापर्यंत त्यांच्या एजंटना कमिशन म्हणून देते. हे फक्त पॉलिसीच्या पहिल्या हप्त्यावर (पहिल्या वर्षाच्या प्रीमियम) लागू होते, त्यानंतर कमिशन कमी होते. पॉलिसीधारकाने जितक्या वेळा प्रीमियम जमा केला असेल तितक्या वेळा एजंटला कमिशन मिळेल. एजंटला पॉलिसी फक्त एकदाच करावी लागते. त्यानंतर प्रत्येक हप्त्यावर त्याचे कमिशन ठरलेले असते.
8 / 12
LIC एजंट होण्यासाठी शैक्षणिक पात्रता किमान 10वी उत्तीर्ण आणि वय 18 वर्षे असावे. जवळच्या LIC कार्यालयाशी संपर्क साधा आणि तेथील डेव्हलपमेंट अधिकाऱ्याला भेटा. शाखा व्यवस्थापक मुलाखत घेईल आणि जर त्यांना तुम्ही योग्य वाटलात तर तुम्हाला प्रशिक्षणासाठी विभाग/एजन्सी प्रशिक्षण केंद्रात पाठवले जाईल. प्रशिक्षण २५ तासांचे आहे. यामध्ये जीवन विमा व्यवसायाच्या सर्व पैलूंचा समावेश होतो.
9 / 12
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) द्वारे घेण्यात येणारी भरतीपूर्व चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जे परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना विमा एजंटचे नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र दिले जाते. तुम्हाला शाखेच्या वतीने एजंट म्हणून नियुक्त केले आहे. या दरम्यान तुम्ही तुमच्या विकास अधिकार्‍याच्या अंतर्गत असलेल्या टीमचा भाग असाल.
10 / 12
६ पासपोर्ट आकाराचे फोटो. १०वीच्या गुणपत्रिकेची छायाप्रत. पत्ता पुरावा- मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्डची प्रत.
11 / 12
एलआयसीच्या वेबसाइटनुसार, एंडोमेंट आणि मनीबॅक पॉलिसी अंतर्गत कमिशन वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध आहे. दोन्ही पॉलिसींमध्ये कमिशनचे दर वेगवेगळे आहेत. एंडोमेंट पॉलिसीवरील हप्त्याच्या एकूण भागाच्या ३५ टक्के आणि मनीबॅकमध्ये हप्त्याच्या एकूण भागाच्या २५ टक्क्यांपर्यंत कमिशन उपलब्ध आहे. यानंतर कमिशन कमी होऊ लागते. एजंटचे कमिशन एलआयसी पॉलिसीनुसार ठरवले जाते. एजंटला एंडोमेंट पॉलिसीवर पहिल्या कमिशनच्या हप्त्याच्या २५% पर्यंत मिळते.
12 / 12
याशिवाय, ४० टक्के अतिरिक्त कमिशन एजंटला दिले जाते. जर एजंटने नियुक्त केलेल्या क्लायंटने पॉलिसीचा पहिला हप्ता म्हणून १०,००० रुपये जमा केले, तर एजंटला कमिशन म्हणून २,५०० रुपये मिळतील. याशिवाय १००० रुपये कमिशनच्या ४० टक्के आहेत. अशा प्रकारे, एजंटला पहिल्या हप्त्यावर सुमारे रु.3500 कमिशन मिळेल. पॉलिसी जितकी जास्त असेल तितका एजंट अधिक कमाई करेल.
टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसी